Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात 'या' ठिकाणी वाजली शाळेची घंटा

राज्यात 'या' ठिकाणी वाजली शाळेची घंटा
, बुधवार, 1 डिसेंबर 2021 (13:02 IST)
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून शाळा बंद होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना दक्षिण आफ्रिकेत आढलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यानं पुन्हा सावध पवित्रा घेताला आणि मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. पण महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच काही भागातील शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. 
 
नंदूरबार जिल्ह्यात 1855 शाळांमध्ये एक लाख 88 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी आजपासून दोन वर्षाचा खंडानंतर आपल्या शिक्षणाला सुरुवात करत आहेत तर चंद्रपूर जिल्ह्यात वर्ग 1 ते 4 च्या 2417 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून पहिली ते चौथीच्या शाळा उघडल्या असून जिल्ह्यात 2 हजार 522 शाळांमध्ये घंटा वाजली. 
 
धुळे जिल्ह्यात शहरी भागात 177 ग्रामीण भागात 1 हजार 370 शाळा सुरु झाल्या. परंतु सुरुवातीचे काही दिवस फक्त तीनच तास शाळा सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. तसेच शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
 
हे आहे नियम- 
दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटचा सामाजिक अंतर असावा.
शाळेत सर्वांनी मास्क वापरावा.
वारंवार हात धुणे आणि शाळा स्वच्छ राखणे आवश्यक आहे.
नॉन टिचिंग स्टाफ देखील वॅक्सिनेट असावा.
बायोमेट्रिक अटेंडेंस सिस्टम लागू होणा नाही.
शाळेत गर्दी होणारी अॅक्टिव्हिटी जसे गेम्स आणि ग्रुप प्रेयर करु नये.
विद्यार्थी किंवा शिक्षक अस्वस्थ असल्यास शाळेत येणे टाळावे.
क्वारंटाइन विद्यार्थी ऑनलाईन क्लास अटेंड करु शकतात.
 
जर शाळेत एकाच वर्गात दोन आठवड्यात पाचहून अधिक विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्यास शाळेत कोरोना बचावसाठी निर्धारित योजनेचं पालन करावं लागेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ममता बॅनर्जींच्या शरद पवार आणि आदित्य ठाकरेंच्या भेटीमागे काय कारण दडलंय?