Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इसुदान गढवी गुजरातमध्ये 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, 16 लाखांपैकी 73 टक्के लोकांचे समर्थन

इसुदान गढवी गुजरातमध्ये 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, 16 लाखांपैकी 73 टक्के लोकांचे समर्थन
, शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (14:59 IST)
अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी इसुदान गढवी यांची पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा करताना केजरीवाल म्हणाले की, 16 लाखांहून अधिक लोकांपैकी 73 टक्के लोकांनी इसुदानच्या नावावर शिक्का मोतर्ब केले आहे.
 
AAP कडून सर्वोच्च पदाच्या शर्यतीत, त्यांच्या राज्य युनिटचे अध्यक्ष गोपाल इटालिया, राष्ट्रीय सरचिटणीस इसुदान गढवी आणि सरचिटणीस मनोज सोराठिया यांचा समावेश होता. राज्यातील जनतेने पक्षाला दिलेल्या कौलाच्या आधारे उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आले.
 
गेल्या आठवड्यात, केजरीवाल यांनी लोकांना एसएमएस, व्हॉट्सअॅप, व्हॉईस मेल आणि ई-मेलद्वारे पक्षाशी संपर्क साधून आणि राज्यातील पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असावा यावर आपले मत मांडावे असे आवाहन केले होते. सध्या भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे.
 
3 नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत लोक आपले मत मांडू शकतात आणि त्यांच्या मताच्या आधारे पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव दुसऱ्या दिवशी जाहीर केले जाईल, असे ते म्हणाले होते.
 
AAP ने गुजरात निवडणुकीसाठी 10 उमेदवारांची आपली नववी यादी जाहीर केली आणि आतापर्यंत घोषित उमेदवारांची संख्या 118 वर नेली. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका पुढील महिन्यात 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात होणार आहेत तर मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे.

Edited by: Rupali Barve

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवजात मुलीच्या पोटात अविकसित 8 भ्रूण आढळले, जगातील पहिलेच प्रकरण