हनुमान चालीसा पाठ केल्याने जीवनातील सर्व संकट नाहीसे होतात. हनुमान अजर-अमर आहेत. भक्तांवर त्यांची कृपा असून ते भक्तांची इच्छा पूर्ण करतात. जेथे-जेथे रामकथा होते तेथे-तेथष हनुमान कोणत्या न कोणत्या रुपात असतात.हनुमान चालीसाचा पाठ केल्याने शरीर देखील निरोगी राहतं. यात आरोग्याशी निगडित रहस्य देखील दडलेले आहेत.
1- हनुमानाला बल, बुद्धी आणि विद्या दाता म्हटले आहे म्हणून हनुमान चालीसा पाठ केल्याने स्मरण शक्ती सुधारते आणि बुद्धिमत्ता वाढते.
2- दररोज हनुमान चालीसा पाठ केल्याने आध्यात्मिक शक्ती वाढते. केवळ अध्यात्मिक शक्तीनेच आपण जीवनातील प्रत्येक समस्येचा सामना करू शकतो. आध्यात्मिक शक्तीच्या मदतीने आपण शारीरिक रोगांवरही विजय मिळवू शकतो.
3- हनुमान चालीसा पाठ केल्याने सर्व प्रकारच्या भीती आणि तणावातून मुक्ती मिळते. हनुमान चालीसाच्या या चौपाईमध्ये म्हटले आहे की - "सब सुख लहै तुम्हारी शरना, तुम रक्षक काहू को डरना॥"
अर्थात जी व्यक्ती आपल्या चरणी येते तिला आनंदाची प्राप्ती होते आणि आपण रक्षक असल्यावर कोणाचीही भीती राहत नाही.
4- दररोज श्रद्दा भावाने हनुमान चालीसा पाठ केल्याने सर्व आजारांपासून मुक्ती मिळते. वेदना नाहीश्या होतात. हनुमान चालीसा मध्ये म्हटले आहे कि "नासै रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा"
अर्थात वीर हनुमान आपल्या सतत जप केल्याने सर्व आजार मिटतात आणि सर्व वेदना नाहीश्या होतात.
5- आपण जीवनात कोणत्याही शारीरिक संकटाला सामोरा जात असाल किंवा कोणत्याही कौटुंबिक किंवा आर्थिक संकटाचा सामना करत असाल अशात हनुमान चालीसा पाठ केल्याने संकट पार करण्याची उमेद असते. "संकट तें हनुमान छुड़ावै, मन क्रम बचन ध्यान जो लावै"
अर्थात हे हनुमान विचार करण्यात, कर्म करण्यात आणि बोलण्यात, ज्यांचं आपल्यात मन रमलेलं असतं त्यांना आपण संकटातून मुक्त करतात.
6- हनुमान चालीसा पाठ केल्याने घरात, मनात आणि शरीरातून नकारात्मक ऊर्जेचा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. सकारात्मक ऊर्जा व्यक्तीला दीर्घ आयुष्य जगण्यास मदत करते.
7- ज्योतिष शास्त्राप्रमाणे प्रत्येक ग्रहाचा शरीरावर वेगवेगळा प्रभाव पडत असतो. ग्रहांचा वाईट प्रभाव असल्यास संबंधित आजार होतात. जसे शनीमुळे फुफ्फुसांचा आकुंचन, श्वास घेण्यास त्रास, चंद्रामुळे मानसिक आजार इतर. त्याचप्रमाणे सर्व ग्रहांपासून रोग उद्भवतात. परंतु आपण नियमाने हनुमान चालीसा वाचल्यास ग्रहांच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळते.