Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोम प्रदोष व्रत पूजा विधी, मंत्र आणि कथा

shiva
, सोमवार, 11 जुलै 2022 (07:37 IST)
हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्व आहे. दर महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात. या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार, शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असतो. प्रदोष व्रत सोमवारी येत असल्याने याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. हिंदू धर्मांप्रमाणे सोमवारचा दिवस महादेवाचा दिवस मानला जातो, म्हणून जेव्हा या दिवशी प्रदोष व्रत आल्यास याचं महत्त्वचं अजूनच वाढतं. 
 
सोम प्रदोष व्रत पूजा विधी
प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा प्रदोष काळात केली जाते. 
सूर्यास्तापासून 45 मिनिटाआधी व सूर्यास्ताच्या 45 मिनिटानंतर पर्यंतचा काळ प्रदोष काळ मानला जातो.
प्रदोष व्रतात महादेवाचं अभिषेक करुन बिल्व पत्र अर्पित करावे.
शिव मंत्रांनी जप करावं.
जप केल्यानंतर प्रदोष व्रत कथा ऐकावी.
प्रदोष व्रत कथा 
नंतर आरती करुन कुटुंबात प्रसाद वितरित करावा.
 
महामृत्युंजय मंत्र
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात्

सोम प्रदोष कथा
पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मणीचं पतींचं निधन झाल्यामुळे तिला पोटापाण्यासाठी मुलासमवेत भीक मागण्यासाठी घराबाहेर पडावं लागत होतं. ती स्वत: आणि आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची. दिवस सरत असताना एके दिवस ब्राह्मणी घरी परत येत होती तेव्हा तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विव्हळत दिसला. ब्राह्मणीने त्याला आपल्या घरी आणले. मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता. शत्रूच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते. त्यांनी राज्याचा ताबा घेतला होता म्हणून तो मुलगा अशा अवस्थेत इकडे-तिकडे फिरत होता.
 
राजकुमार ब्राह्मणांच्या घरात राहू लागला. मग एके दिवस अंशुमति नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमारला पाहिले ती त्याला मोहित झाली. दुसर्‍या दिवशी अंशुमति तिच्या आईवडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली. त्यांना देखील राजपुत्र पसंत पडला. काही दिवसांनंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आई-वडिलांना स्वप्नात आज्ञा केली की राजकुमार आणि अंशुमतीचे लग्न करावे आणि त्यांनीही तेच केले.
 
ब्राह्मणी प्रदोष व्रत करत होती. आपल्या मनोभावे उपवासाचा परिणामामुळे आणि गंधर्वराजांच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळवून लावले. राजकुमाराने आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले. राजकुमारने ब्राह्मण-मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनविले. 
 
या प्रकारे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले. अशाच प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात. म्हणूनच, सोम प्रदोष यांचे उपवास ठेवणार्‍या सर्व भक्तांनी ही कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बकरी ईद : मुस्लीम समाज वर्षातून 3 वेळा ईद साजरा करतात का?