यावेळी 13 जून, बुधवारी ज्येष्ठ अधिक मास अमावस्या आहे. ही अमावस्या 3 वर्षातून एकदा येते म्हणून याचे विशेष महत्त्व आहे.
1. एखाद्या पवित्र नदीत काळे तीळ अर्पित करावे.
2. पिंपळाच्या झाडाला जल चढवावे आणि गायीच्या तुपाने दिवा लावावा.
3. एखाद्या ब्राह्मणाला भोजनासाठी घर बोलवावे किंवा भोजन सामग्री दान करावी.
4. गायीला हिरवा चारा खाऊ घालावा.
5. तांदळाच्या पिठाने 5 पिंड तयार करून लाल कापडात गुंडाळून नदीत प्रवाहित करावे.
6. गायीच्या शेणाने तयार कंडे जाळून त्यावर तूप-गुळाचे धूप द्यावे आणि पितृ देवताभ्यो अर्पणमस्तु असे म्हणावे.
7. कच्चं दूध, जवस, तीव व तांदूळ मिसळून नदीत प्रवाहित करावे.