पृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला सोडून गेल्यानंतर मनुष्याला जावे लागते. या जगात व्यक्ती स्वतःहून जात नाही बलकी यमाचे दोन दूत घेऊन जातात. जेवढे भयानक यमदूत असतात त्यापेक्षाही भयानक आणि खतरनाक इथले गाव असतात.
या गावांची सख्या एक नसून पूर्ण सोळा आहे आणि जीवनाचे पाप कर्म करणार्या मनुष्याला या सर्व गावांमध्ये वेग वेगळ्या प्रकारच्या कष्टांना समोरे जाऊन शेवटी यमपुरी पोहोचायचे असते. या भयानक गांवांबद्दल गरूड पुराणात विस्ताराने वर्णन करण्यात आले आहे.
या गावांचे नाव आहे सौम्यपुर, सौरिपुर, गन्धर्वपुर, शैलगाम, क्रौंचपुर, विचित्र भवन, बह्वापदपुर, दुःखपुर, नानाक्रन्दपुर, सुतप्तभवन, रौद्रपुर, पयोवर्षणपुर, शीताढयपुर आणि बहुभीतिपुर.
विष्णू यांनी गरूडाला म्हटले की या गावांच्या मार्गात न तर विश्रामासाठी वृक्षाची सावली आहे आणि न कुठे अन्नादि, ज्यामुळे प्राणाची रक्षा होऊ शकते. मार्गात प्रलयकालच्या वेळेस बरेच सूर्य चमकतात ज्यामुळे पिण्डाने तयार केलेले शरीर तापत राहत. पिण्यासाठी पाण्याचा एकही थेंब मार्गात कुठेही उपलब्ध नसतो.
या मार्गात एक असिपत्र नावाचे वन आहे, या वनात कावळा, घुबड (उल्लू) गीद्घ, मधमाशी, मच्छर तथा बर्याच जागेवर जंगलाची आग आहे. या सर्वांपासून पीडा भोगत प्रेतात्मा कधी मल-मूत्र व रक्ताच्या चिखलात पडतो तर कधी अंधार असलेल्या विहिरीत जाऊन आदळतो.
या मार्गात मिळणारे कष्ट एवढे भयानक आहे की ज्यांना वाचून मन भयभीत होऊ शकतो. गरूड पुराणात मृतक संस्कार पासून मृत्यूनंतरच्या स्थितीचे वर्णन मिळतात.