Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आवळा नवमी : तर या प्रकारे झाली आवळ्याची उत्पत्ती

आवळा नवमी : तर या प्रकारे झाली आवळ्याची उत्पत्ती
, शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (12:04 IST)
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी आवळा नवमी म्हणून साजरी केली जाते, ही अक्षय नवमी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवण करण्याची प्रथा आहे. या दिवशी ब्राह्मणांना आवळ्याच्या झाडाखाली स्वयंपाक करून जेवू घालावे नंतर स्वतः जेवावं. जेवणं करताना पूर्वीकडे तोंड करून बसावं. 
 
शास्त्रात सांगितले आहे की जेवताना ताटलीत आवळ्याचं पान पडले तर ते शुभ असतं. असे म्हणतात की ताटात आवळ्याचं पान पडले तर येत्या वर्षात त्या व्यक्तीचे आरोग्य चांगलं राहतं. पण आपणास ठाऊक आहे का की आयुर्वेदात चमत्कार समजल्या जाणाऱ्या आवळ्याची उत्पत्ती कशी झाली ?
 
आवळ्याची उत्पत्ती कशी झाली- 
जेव्हा संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली बुडाली आणि पृथ्वीवर जीवनच नव्हते, तेव्हा ब्रह्मा कमळाच्या फुलात बसून निराकार परब्रह्माची तपश्चर्या करीत होते. त्यावेळी ब्रह्माजींच्या डोळ्यातून ईश्वरीय भक्तीचे अश्रू गळत होते. या अश्रूंपासूनच आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली, त्यापासून आवळ्याचे चमत्कारी औषधी फळाची प्राप्ती झाली. 
 
आयुर्वेद आणि विज्ञानानुसार आवळ्याचे महत्त्व - 
आचार्य चरक यांच्या म्हणण्यानुसार, आवळा एक अमृत फळ आहे, जे बऱ्याच रोगांचे निर्मूलन करण्यात यशस्वी आहे. विज्ञानानुसार आवळ्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं. जे उकळवून देखील पूर्णपणे राहत. हे आपल्या शरीरातील पेशींची निर्मिती वाढवत, जे शरीरास निरोगी ठेवतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुरुचरित्र – अध्याय सोळावा