सनातन धर्मात स्वस्तिकच्या चिन्हांना खूप शुभ आणि कल्याणकारी मानले गेले आहेत. स्वस्तिक हे गणेशाचे प्रतीक मानले गेले आहे. स्वस्तिक चिन्हांची उत्पत्ती आर्यांद्वारे केली आहे असे मानले जाते. स्वस्तिक चिन्हांचा वापर प्रत्येक शुभ आणि मंगल कार्यात करतात. धार्मिकसह स्वस्तिकचे वास्तूमध्ये देखील महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊ या घरात स्वस्तिक चिन्ह बनविण्याचे चमत्कारिक फायदे.
* वास्तूमध्ये मुख्यदारावर दोन्ही बाजूच्या भिंतींवर स्वस्तिक चिन्ह बनवण्याविषयी सांगितले आहेत. या मुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. जर आपल्या घराच्या दारात वास्तुदोष असल्यास तर त्याचा दुष्परिणामांपासून आराम मिळतो. घरात समृद्धी येते. मुख्य दाराचे वास्तुदोष दूर करण्यासाठी 9 बोट लांब आणि रुंद स्वस्तिक चिन्ह मुख्य दारावर शेंदूराने आखावे.
* घरातील अंगणात स्वस्तिक -
अंगणात मधोमध मांडण्याच्या रूपात स्वस्तिक बनवणं देखील शुभ असतं. पितृपक्षात घराच्या अंगणात शेणाने स्वस्तिक बनविल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो. ज्यामुळे घरात सुख-शांतता नांदते. घराच्या अंगणात स्वस्तिक आखल्याने सर्व नकारात्मक शक्ती घरातून बाहेर निघून जाते.
* घरातील देवघरात स्वस्तिक-
देवघरात स्वस्तिक काढल्याने त्यावर देवी-देवांची मूर्ती स्थापित केल्यानं त्यांचा आशीर्वाद मिळतो. जेथे आपण आपल्या इष्टदेव किंवा इष्टदेवींची पूजा करतो त्या जागी देवांच्या आसनावर स्वस्तिक काढणे शुभ असतं.
* तिजोरी किंवा पैशाचा कपाटात स्वस्तिक बनवावं -
तिजोरीमध्ये स्वस्तिकचे चिन्ह बनवल्याने समृद्धी बनून राहते. आई लक्ष्मी प्रसन्न होते. ज्यामुळे घरात पैशाची कमतरता भासत नाही. दिवाळी किंवा इतर शुभ प्रसंगी देवी लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी स्वस्तिक बनवून त्यावर बसवावे.
* घराच्या उंबऱ्याची पूजा करताना स्वस्तिक बनवावं-
जे लोक दररोज सकाळी उठल्यावर विश्वासाने आई लक्ष्मी येण्याचा विचाराने उंबऱ्याची पूजा करून उंबऱ्याचा दोन्ही बाजूस स्वस्तिक बनवतात त्यांच्या घरात आई लक्ष्मीचा वास असतो. दररोज सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केल्यावर धुपाची कांडी दाखवून देवाची पूजा करावी. नंतर उंबऱ्याची पूजा करताना दोन्ही बाजूला स्वस्तिकचे चिन्ह बनवावे.