सूर्य देवतेची पूजा केल्याचे अनके फायदे आहेत. याने जीवनात यश मिळतं, आत्मविश्वास वाढतो आणि सर्व अडथळे दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात. आठवड्यात दररोज सूर्याची आराधना केली पाहिजे तरी असे करणे शक्य नसल्यास किमान रविवारी सूर्याला अर्घ्य देऊन मनोभावे पूजा केल्यास मनोकामना निश्चित पूर्ण होतात.
सूर्य उपासना करताना आदित्यस्त्रोताचा पाठ करावा. कुंडलीत सूर्य कमकुवत स्थानी असल्यास सूर्याची उपासना नक्की करावी नाहीतर आविष्यभर मेहनत करुन देखील अपेक्षित यश हे मिळतच नाही.
सूर्याला अर्घ्य देण्याचे विशेष महत्त्व आहे. रोज सकाळी उठून तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात लाल फुलं आणि अक्षता टाकाव्या. नंतर सूर्य देवाच्या मंत्राचा जप करावा. जप करताना भांड्यातले पाणी अर्पण करावे. या प्रकारे अर्घ्य दिल्याने दीर्घायुष्य आणि धन-सौभाग्यची प्राप्ती होते.
रविवारी पाळा हे नियम
सकाळी उठल्यावर अंघोळ केल्यावर सूर्याला अर्घ्य द्यावे.
सूर्यनारायणाला तीन वेळा पाणी अर्पण करून नमस्कार करावा.
संध्याकाळी पुन्हा एकदा सूर्यदेवाला पाणी वाहून नमस्कार करावा.
सूर्य देवाच्या मंत्राचा जप करावा.
मन शातं असू द्यावं.
रविवारी तेल आणि मीठाचे सेवन करू नये.
रविवारी एकाच वेळेस जेवण करावे.