Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 7 April 2025
webdunia

आज चुकून करू नका हे 8 काम, नाहीतर आविष्यभर पश्चात्ताप होईल

hindu dharm
आज म्हणजे 29 नोव्हेंबरला काल भैरव जयंती आहे. कालाष्टमीला महादेवाच्या रूपात काल भैरवाची आराधना केली जाते. याचे एक नाव दंडपाणी देखील आहे. भैरव यांची स्वारी काळा कुत्रा आहे. कालाष्टमी जयंतीच्या दिवशी अनेक काम अशी आहेत ज्या केल्याने पूजेचा फल मिळत नसतो. काल भैरव जयंतीच्या रात्री काल भैरवाची अर्चना केली पाहिजे. या दिवशी जप, पाठ आणि हवन असे धार्मिक कृत्य केल्याने मृत्यू तुल्य रोग-कष्ट देखील दूर होऊन जातात. 
 
या दिवशी व्रत उपासना केल्याने सर्व प्रकाराच्या कष्टांपासून मुक्ती मिळते.
 
तर यासोबतच काही काम असे आहे जे या दिवशी करणे टाळावे नाहीतर पश्चाताप होतो... तर जाणून घ्या कोणते असे काम आहे जे आज चुकून करू नये:
 
तसेतर खोटे बोलणे वाईट सवय आहे परंतू कोणचं नुकसान होत नसलं तर अनेकदा खोट बोलून लोकं वेळ निभावून घेतात परंतू आज म्हणजे काल भैरव जयंतीच्या दिवशी मुळीच खोटे बोलू नये.
 
व्रत करणार्‍यांनी अन्न ग्रहण करू नये.
 
घरात स्वच्छता राखावी. साफ-सफाई असू द्यावी.
 
या दिवशी कुत्र्याला दुत्कारणे योग्य नाही. कुत्र्याला दगड मारणे देखील टाळावे. शक्य असल्यास या दिवशी कुत्र्याला भोजन द्यावे.
 
मीठ खाणे टाळावे. ज्यांना मीठ टाळावे शक्य नाही त्यांनी काळं मीठ खावे.
 
या दिवशी माता-पिता आणि गुरु तसेच वडिलधार्‍यांना सन्मान द्यावा. त्यांची उलटसुलट वागू नये. त्यांचा अपमान होईल असे कोणतेही काम करणे टाळावे.
 
या दिवशी काल भैरवाची आराधना करावी परंतू महादेव आणि पार्वतीची पूजा केल्याविना काल भैरवाची आराधना अपुरी राहील.
 
या दिवशी दिवसा झोपणे टाळावे तसेच रात्री देखील जागरण करत भक्तीत वेळ घालवावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काल भैरव जयंती: अष्टमीला 10 पैकी 1 उपाय, वाईट शक्ती दूर होईल