Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भुलाबाई गाणी : मग जा आनंदात माहेरा माहेरा !!

भुलाबाई गाणी : मग जा आनंदात माहेरा माहेरा !!
, गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (14:13 IST)
सकाळी लवकर उठ ग सुनबाई, नकोच जाऊ माहेरा माहेरा,
सकाळी उठून योगा कर ग सुनबाई, नकोच जाऊ माहेरा माहेरा,
सकाळीच न्याहरी पोटभर घेत जा, ग सून बाई, नकोच जाऊ माहेरा माहेरा,
एखाद्या छंदात गुंत ग सुनबाई नकोच जाऊ माहेरा माहेरा,
आपली आवड जोपास ग सुनबाई नकोच जाऊ माहेरा माहेरा,
पाहिजे ते कपडे घाल ग सुनबाई नकोच जाऊ माहेरा माहेरा,
मुलांवर चांगले संस्कार कर ग सुनबाई नकोच जाऊ माहेरा माहेरा,
मिळून सर्व कामे करू ग सुनबाई नकोच जाऊ माहेरा माहेरा,
घराचं अंगण सजव ग सुनबाई नकोच जाऊ माहेरा माहेरा,
तुझंच घर हे आहे ग सुनबाई नकोच जाऊ माहेरा माहेरा,
स्वतन्त्र तू आहेस ग सुनबाई नकोच जाऊ माहेरा माहेरा,
सध्याचा काळ बरा नाही ग सुनबाई, नकोच जाऊ माहेरा माहेरा,
थोडी कळ सोस ग सुनबाई मग जा तू माहेरा माहेरा,
कोरोना ची लस येऊ दे ग सुनबाई, मग जा आनंदात माहेरा माहेरा !!
....अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एक अखंड दिवा लावून आपण कोट्याधीश होऊ शकता