suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Chaitra Gauri 2026 Wishes In Marathi चैत्र गौरी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

Chaitra Gauri 2026
चैत्र महिना म्हणजे नवचैतन्याचा आणि मांगल्याचा काळ. या निमित्ताने तुमच्यासाठी काही निवडक शुभेच्छा संदेश खालीलप्रमाणे आहे. 
 

चैत्र गौरी पूजन शुभेच्छा संदेश

चैत्र गौरी उत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा! 
 
चैत्र गौरीच्या आगमनाने तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. आदिशक्तीच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदी होवो. चैत्र गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
वसंताच्या चैत्र पालवीप्रमाणे तुमचे आयुष्यही बहरून जावो. देवी गौरीची कृपा तुमच्यावर कायम राहो. चैत्र गौरीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
सण हा मांगल्याचा, सण हा सौभाग्याचा! चैत्र गौरीच्या निमित्ताने तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा आणि आनंद वाढो. गौरी तृतीयेच्या शुभेच्छा!
 
चैत्र गौरीच्या उत्सवात तुमच्या घरी चैतन्य आणि मांगल्याचा सुगंध दरवळू दे. माता गौरी तुम्हाला अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य देवो, हीच प्रार्थना.  चैत्र गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
आली आली चैत्र गौरी, सुखाची घेऊन आली शिदोरी. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. चैत्र गौरीच्या खूप खूप शुभेच्छा!
 
हळदी-कुंकू, आंबा डाळ आणि पन्ह्याचा हा मधुर आस्वाद! चैत्र गौरीचा हा सण तुमच्या आयुष्यात गोडवा घेऊन येवो. चैत्र गौरी पूजनाच्या शुभेच्छा!
 
निसर्गाच्या नव्या रूपाप्रमाणे तुमचे आयुष्यही सकारात्मक ऊर्जेने भरून जावो. देवी गौरीची माया तुमच्या पाठीशी सदैव राहो.  चैत्र गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
चैत्र शुद्ध तृतीयेच्या या शुभ दिनी, देवी गौरीच्या आशीर्वादाने तुमच्या घरात धन-धान्याची कमतरता नसो. चैत्र गौरी उत्सवाच्या शुभेच्छा!
 
चैत्र गौरी निमित्त होणारी हळदी-कुंकवाची भेट, नात्यांमधील ओलावा आणि प्रेम अधिक घट्ट करो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना  चैत्र गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
चैत्राच्या ऊन्हातही शीतल गारवा देणारा हा सण! माता गौरीच्या चरणी नतमस्तक होऊन, तुम्हाला सुखद भविष्यासाठी शुभेच्छा!  चैत्र गौरी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
ALSO READ: चैत्र गौरी हळदी कुंकू सजावट

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ramadan Eid Mubarak 2026 Wishes In Marathi रमजान ईद शुभेच्छा संदेश