1 कठोर परिश्रम केल्याने दारिद्र्य येत नाही, धर्म केल्याने पाप राहत नाही, मौन बाळगण्याने मतभेद होत नाही आणि जागतं राहण्याने भीती राहत नाही.
2 जग हे कडू झाडासारखे आहे, याचे दोनच फळे गोड असतात - एक गोड बोलणं आणि दुसरं सज्जनांचे सहवास असणं.
3 ब्राह्मणांचे सामर्थ्य आहे ज्ञान, राजांचे सामर्थ्य त्यांचे सैन्य आहे, वैश्यांचे सामर्थ्य त्यांची संपत्ती आहे आणि शूद्रांचे सामर्थ्य इतरांची सेवा करणे आहे. ब्राह्मणांचे कर्तव्य ज्ञानार्जन घेणे आहे. राजाचे कर्तव्य आपल्या सैन्याचे बळ वाढवणे आहे. वैश्यांचे कर्तव्य आपल्या व्यापाराला वाढवणे आहे, आणि शूद्रांचे कर्तव्य श्रेष्ठ लोकांची सेवा करणे आहे.
4 ज्या व्यक्तीचा मुलाचा ताबा त्याचा नियंत्रणाखाली असतो, ज्याची पत्नी आज्ञेनुसार आचरण करते आणि जो आपल्या कमावलेल्या पैशांवर पूर्णपणे समाधानी असतो. अशा व्यक्तीसाठी हे जग स्वर्गाप्रमाणे आहे.
5 तोच गृहस्थ सुखी आहे, ज्यांची मुले त्याचा आज्ञेचे पालन करतात. त्यांचा वडिलांचे देखील कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुलांचे संगोपन व्यवस्थितरीत्या करावे. त्याच प्रमाणे अशा व्यक्तीला मित्र म्हणू शकत नाही, ज्यांचा वर विश्वास नाही आणि अशी पत्नी देखील निरर्थक आहे जिच्या पासून कोणतेही प्रकाराचे सुख मिळत नाही.
6 जो मित्र आपल्या समोर गोड गोड बोलत असतो आणि आपल्या पाठी आपले सर्व कार्य बिघडवतो त्याचा त्याग करणंच योग्य असतं. चाणक्य म्हणतात की तो मित्र त्या भांड्या सारखा आहे, ज्याच्या वरील बाजूस दूध लागलेले आहे पण आत विष भरलेलं असतं.