Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चाणक्य नीती : या कामात कधीही दुर्लक्ष करू नका,जीवाला धोका होऊ शकतो

चाणक्य नीती : या कामात कधीही दुर्लक्ष करू नका,जीवाला धोका होऊ शकतो
, बुधवार, 20 जानेवारी 2021 (18:49 IST)
आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या नीतिशास्त्राच्या गोष्टी लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांनी नीतिशास्त्रातील जीवनातील विविध पैलूंशी संबंधित महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल सांगितले आहे. या गोष्टींच्या साराला समजल्यावर आपल्या आयुष्यात समाविष्ट केल्यानं एखादी व्यक्ती सुखी आणि समाधानी जीवन जगू शकतो. आचार्य चाणक्याने काही अशा कृतींबद्दल सांगितले आहे, ज्यांना दुर्लक्षित केल्यावर जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून या गोष्टींबद्दल सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घ्या की कोणत्या कामात निष्काळजीपणा करू नये.  
 
1 चाणक्य नीतीनुसार आजारी असल्यास औषध घेण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नये. रोगाच्या बाबतीत औषध घेण्यात हलगर्जी पणा केल्यास रोग असाध्य रूप घेऊ शकतो. या मुळे एखाद्याचे जीव जाऊ शकतं. म्हणून औषधे घेण्यात खबरदारी घेतली पाहिजे.
 
2 चाणक्य म्हणतात की जेवण करण्यात संयम बाळगणे आवश्यक आहे. एखाद्याला आपल्या पचन क्षमतेनुसार जेवावे.असं न केल्यास व्यक्तीच्या आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकतं. पचन बद्दल कधीही हलगर्जी पणा करू नये. या शिवाय जास्त अन्नाचा सेवन केल्यानं माणूस दारिद्र्य होऊ शकतो.
 
3 पैशाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. पैशाचा योग्य वापर न केल्यानं  त्याचा नाश होऊ शकतो. आणि वाईट काळात पैशाची गरज भासल्यावर मोठ्या संकटाला सामोरी जावं लागतं.एखादा अपघात झाल्यावर किंवा आजार पण आल्यावर जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून पैसे खर्च करताना काळजी घ्यावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २४