5 जूनचे ग्रहण पाळू नये, वटपूजन करता येईल : दाते

बुधवार, 3 जून 2020 (12:54 IST)
ज्येष्ठ पौर्णिमेस, 5 जूनला शुक्रवारी चंद्रग्रहण असून हे ग्रहण नेहमीच्या हणाप्राणे नसून ‘छायाकल्प' ग्रहण असल्याने या ग्रहणाचे वेध व इतर कोणतेही नियम कोणीही पाळू नयेत, त्यामुळे नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार, पूजा, अर्चा, कुळधर्म, कुलाचार करावेत, तसेच यावर्षी कोरोनामुळे प्रत्यक्ष वडाचे पूजन करणे शक्य होणार नाही म्हणून वडाचे चित्र काढून घरात वटपूजन करावे. 
 
तेव्हा नेहमीप्रमाणे 5 जूनला शुक्रवारी माध्यान्हपर्यंत सुमारे दुपारी दीड वाजेपर्यंत कोणत्याही वेळी घरी वटपूजन करावे, असे पंचांगकर्ते दाते यांनी सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख बुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या