Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंदोदरीचे दोन पती होते, ही कथा ऐकून आपण थक्क व्हाल...

Mandodari in Mahabharat

अनिरुद्ध जोशी

, गुरूवार, 23 एप्रिल 2020 (16:50 IST)
ऋषी पुलस्त्य यांचा मुलगा आणि महर्षी अगस्त्यांचे भाऊ महर्षी विश्रवा यांनी राक्षस सुमाली आणि ताडकाची कन्या राजकुमारी कैकसीशी लग्न केले. कैकसीला तीन मुलगे आणि एक मुलगी झाली -रावण, कुंभकर्ण, विभीषण आणि शूर्पणखा. विश्रवाची दुसरी बायको ऋषी भारद्वाज यांची कन्या इलावीडा असे. ह्यांचा पासूनच कुबेर यांचा जन्म झाला. इलावीडाला वरवर्णिनी पण म्हणतात. अशी आख्यायिका आहे की इलावीडा वैवस्वतवंशी चक्रवर्ती सम्राट तृणबिंदूची अलंबुषा नावाची अप्सरा पासून जन्मली होती. अश्या प्रकारे कुबेर रावणाचे सावत्र भाऊ होते. 
 
रावणाला त्रेलोक्य विजयी, कुंभकर्णाला 6 महिन्याची झोप आणि विभीषणाला भगवद्भक्तीचे वर प्राप्त झाले होते. त्यांनी कुबेरापासून लंका हिसकावली होती आणि त्यामध्ये आपले वास्तव्य केले होते. 
 
रावणाने दितीचा मुलगा मय यांची कन्या मंदोदरीशी लग्न केले होते. मंदोदरीचा जन्म हेमा नावाच्या अप्सरेचा पोटी झाला होता. विरोचनचा मुलगा बलीची मुलगी वज्रवलाशी कुंभकर्णाचे आणि गंधर्वराज महात्मा शैलेषु यांची कन्या सरमाशी विभीषणाचे लग्न झाले. 
 
मंदोदरीची जन्मकथा - 
पौराणिक कथेनुसार मधुरा नावाची एक अप्सरा असे. एहूद ती कैलास पर्वतावर जाते तिथे देवी पार्वतीला न बघून ती महादेवाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. देवी पार्वती तिथे पोहोचल्यावर मधुराच्या अंगावर शंकराची भस्म बघून संतापते आणि मधुराला श्राप देते की बेडूक बनून 12 वर्षापर्यंत या विहीरतच राहशील. शंकराने पार्वतीला समजवल्यावर पार्वती मधुराला म्हणते की कडी तपश्चर्या केल्यावरच तिला तिचे खरे रूप प्राप्त होऊ शकेल. मधुराने 12 वर्षापर्यंत घोर तपश्चर्या केली. 12 
 
वर्ष पूर्ण होत असताना मायासुर आणि त्यांची पत्नी हेमा अपत्य प्राप्तीसाठी तपश्चर्या करण्यासाठी तेथे आले ज्या स्थळी मधुरा तपश्चर्या करत होती. 12 वर्ष पूर्ण झाल्यावर मधुराला तिचे वास्तविक रूप परत मिळाले आणि ती मदतीसाठी हाका मारू लागली. हेमा आणि मायासुरने तिची आवाज ऐकली आणि तिला बाहेर काढले त्यांनी तिचा मुलगी म्हणून सांभाळ केला आणि तिचे नाव मंदोदरी ठेवण्यात आले.
 
मंदोदरी विषयी निवडक गोष्टी - 
* मंदोदरी, दितीचा मुलगा मायासुर आणि हेमा नावाच्या अप्सरेची मुलगी असे.
* पंच कन्या मंदोदरीला चिरकुमारी नावाने देखील ओळखले जाते.
* आपल्या पती रावणाच्या मनोरंजनासाठी मंदोदरीने बुद्धिबळाचा खेळ सुरू केला होता.
* मंदोदरीला रावणापासून अक्षय कुमार, मेघनाद, अतिकाय जन्मले. महोदर, प्रहस्त, विरुपाक्ष, आणि भीकम वीर अपत्ये ही पण त्यांची असे.
* अशी आख्यायिका आहे की रावण एका विशिष्ट बाणापासूनच मरण पावणार होता. ह्या बाणाबद्दल मंदोदरीला ठाऊक होते.
 हनुमानाने मंदोदरी कडून हे बाण चोरले आणि रावणाला मारण्यासाठी रामाला दिले.
* सिंघलदीपची राजकन्या आणि एका मातृकेचे नाव देखील मंदोदरी होते. लोकांच्या मतानुसार मंदोदरीही मध्यप्रदेशातील मंदसोर राज्याची राजकन्या होती. असे मानले जाते की मंदोदरी राजस्थानमधील जोधपूर जवळील मंडोरची होती. 
 
मंदोदरीने रावणाशी लग्न केले -
असे म्हटले जाते की भगवान शिव यांच्या वरदानामुळेच मंदोदरीचे लग्न रावणाशी झाले होते. मंदोदरीने भगवान शंकराकडून वरदान मागितले की तिचा नवरा पृथ्वीवरील सर्वात विद्वान आणि शक्तिशाली असावा. मंदोदरीने मेरठच्या सदर भागात श्री बिल्वेश्ववर नाथ मंदिरात भगवान शिवाची पूजा केली येथेच रावण आणि मंदोदरी भेटले. रावणाला बऱ्याच राण्या होत्या पण लंकेची राणी फक्त मंदोदरीच मानली जात असे. 
 
मंदोदरीने विभीषणाशी लग्न का केले ?
मंदोदरीला तिच्या नवऱ्याने केलेल्या दुष्कृत्याची चांगलीच जाणीव होती. तिने रावणाला नेहमी वाईट मार्गाचा नाद सोडून सत्याच्या धरणात येण्याचा सल्ला दिला होता. परंतु आपल्या शक्तीचा अभिमान बाळगून रावणाने कधीच मंदोदरीने सांगितल्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. कधीही त्याचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. रावणाने सीतेला हरण करून आणल्यावरही मंदोदरीने त्याचा विरोध केला होता. आणि सीतेला परत रामाकडे पाठवून द्यायला सांगितले होते. पण रावणाने ऐकले नाही आणि परिणाम राम रावणाचा युद्ध झाला आणि केवळ विभीषणाला वगळता त्याचा संपूर्ण वंशाचा नायनाट झाला.
 
रावणाच्या मृत्यूनंतर फक्त रावणाच्या कुळाचे विभीषण आणि कुळातील काही निवडक बायकाच वाचल्या. युद्ध झाल्यावर मंदोदरी युद्धक्षेत्रामध्ये गेली आणि तिने तेथे तिचा पती, मुलगा आणि इतर नातेवाइकांचा मृतदेह बघून फार वाईट वाटले. मग तिने प्रभू श्रीरामाकडे बघितले जे अलौकिक दिसत होते. लंकेच्या सुखी भविष्यासाठी श्रीरामाने विभीषणाकडे लंकेचे राज्य दिले. विभीषणाच्या राज्याभिषेकानंतर प्रभू श्रीरामाने मंदोदरी समोर विभीषणाशी लग्न करण्याचा अत्यंत विनयशील प्रस्ताव मांडला आणि मंदोदरीला आठवण करून दिली की ती लंकेची राणी आणि अत्यंत शक्तिशाली रावणाची विधवा आहे. असे म्हणतात की त्यावेळी मंदोदरीने काहीच उत्तर दिले नाही. जेव्हा प्रभू श्रीराम आपल्या पत्नी आणि सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्या समवेत अयोध्येला परत आले, तेव्हा मंदोदरीने मागील कारागृहात स्वतःला कैद केले आणि बाहेरील जगापासून सर्व संपर्क तोडून टाकले. पण काही काळानंतर आपल्या महालमधून बाहेर पडली आणि विभीषणाशी लग्न करण्यासाठी तयार झाली.
 
पण मंदोदरीच्या संदर्भात या गोष्टींवर विश्वास ठेवणे सहज नाही कारण मंदोदरी ही एक सती स्त्री होती. जी आपल्या पतीसाठी एकनिष्ठ होती, अश्या परिस्थितीत मंदोदरीने विभीषणाशी लग्न करणे ही एक धक्कादायक घटना आहे. तथापि रामायणात अश्या बऱ्याच विचित्र कथा आहेत. असे ही म्हटले जाते की काही समाजांमध्ये प्राचीनकाळी अशीच प्रथा होती. बालीला ठार मारल्यानंतर सुग्रीवाने त्याचा पत्नीशी लग्न केले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरातल्या गोष्टी कोणालाही सांगू नये, असे आम्ही नाही तर द्रौपदी सांगत आहे