Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाभारतातील हे 5 धडे संकटाच्या वेळी कार्य करतील..

महाभारतातील हे 5 धडे संकटाच्या वेळी कार्य करतील..
, बुधवार, 22 एप्रिल 2020 (08:26 IST)
महाभारताची शिकवणी प्रत्येक युगात तार्किक आहे. कोरोना विषाणूंमुळे येणाऱ्या संकटात महाभारतातील काही धडे उपयोगी ठरतील 
1 कार्याची योजना आखा-  जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात एक चांगली रणनीती आपल्याला यशस्वी बनवू शकते आणि कुठलीही योजना किंवा रणनीती नसल्यास जीवन एका अश्या भविष्याकडे जाईल ज्याच्यामध्ये यशाची काहीही शाश्वती नसेल. भगवान श्रीकृष्णाकडे पांडवांना वाचविण्यासाठीची काही योजना केली नसती तर पांडवांना कोणत्याही परिस्थितीत कौरवांकडून जिंकणे शक्यच नव्हते. म्हणूनच या साठी आपल्याकडे संकटापासून वाचण्याची योजना असावी.
 
2 संयम बाळगा आणि संयम ठेवा- सध्या लॉक डाउन असल्यामुळे घरातच आहोत. घरात जसे आपल्याला संयमित राहावयाचे आहे तसेचं आपल्याला सोशल मीडियावर देखील संयम बाळगणे महत्त्वाचे आहे. आपले एखादे वचन किंवा पोस्ट आपल्याला अडचणीत आणू शकते. शब्दांवर संयम ठेवणे गरजेचे असते काही लोकांनी त्यांच्या शब्दांवर संयम ठेवले असते तर संपूर्ण महाभारत घडलेच नसते. उदाहरणार्थ जर द्रौपदीने दुर्योधनाला "आंधळ्याचा मुलं सुद्धा आंधळं असे म्हटले नसते तर महाभारतच घडले नसते. शिशुपाल आणि शकुनी नेहमी बोचणाऱ्या गोष्टी बोलायचे. पण त्यांचे काय झाले ते तर सर्वांनाच ठाऊकच आहे.
 
3 दररोज आयुष्य मौल्यवान आहे- माणसाचे जीवन, जन्म आणि मरणाच्या मध्याचा दुवा आहे. हे आपले आयुष्य खूपच लहान आहे. दिवस कधी संपतील हे आपल्याला काहीही माहीत नाही. म्हणून आपण आपल्या आयुष्याचा दररोज संपूर्ण वापर केला पाहिजे. आपण आपल्या आयुष्यात पुढील जीवनासाठीची काही कृती केल्या गेल्या पाहिजे. घर आणि ऑफिस सोडून शक्य तेवढी कामे करा. ज्यामुळे आपले मुलं आपली आठवण काढतील. गीता मध्ये पण असे सांगितले आहे की प्रत्येकासाठी अशी कार्ये करा जे आपले जीवन सुंदर बनवतील.
 
4 संग्रहित करू नका- अती लोभ करणे मानवी जीवनाला नरक बनवते. जे आपले नाही ते मिळविण्याचा प्रयत्न करू नये. ते हिसकाविण्याचा प्रयत्न केल्यास त्याची शिक्षा आपल्याला आज नाही तर उद्या नक्की मिळणारच. श्रीकृष्ण म्हणतात की आज जे आपले आहे, काल ते कोण्या दुसऱ्याचे होते आणि उद्या दुसऱ्याचे असणारं. म्हणून मालमत्ता विषयी आसक्ती ठेवू नका. त्यामध्ये गुंतून राहू नका. आपल्या मृत्यूनंतर हे सर्व येथेच राहणार आहे. आपणास काही कमावायचे असेल तर आपल्या कुटुंबाचे प्रेम आणि आपुलकी मिळवा जे नेहमीच आपल्या बरोबर राहणार आहे.
 
5 काळजी, भीती, अशांती आहे मृत्यूचे दार- कोणत्याही प्रकारची काळजी करणे, आणि मनाला अस्वस्थ करणे, व्यर्थाचे भय बाळगणे, मृत्यू भोवती फिरणे सुरू असते. सगळ्यांनाच मरणं येणार मग काळजी कशाला? काळजीचे मुख्य कारण म्हणजे आसक्ती. तुरुंगात, इस्पितळात आणि वेड्यांच्या इस्पितळात तेच जाते ज्याने निधर्मी किंवा माध्यम जीवन जगले नाही. ते अती महत्वाकांक्षी आहे. किंवा ज्याने पैशांने आणि आपल्या सामर्थ्याने आपले संबंध बनविले आहे. किंवा ज्याला आपल्या मालमत्तेच्या सुरक्षेच्या बाबतीत काळजी आहे. महाभारत वाचताना आपल्याला एकच धडा आणि शिकवणी मिळते की काळजीमुक्त जीवन ही आपल्या आयुष्यातील मोठी संपत्ती आहे. काळजी केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रभू श्रीरामाने कपट केले नाही पण श्रीकृष्णाने केलं असे का..?