Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुरु बृहस्पती कोण होते जाणून घ्या

गुरु बृहस्पती कोण होते जाणून घ्या
, शनिवार, 16 जानेवारी 2021 (07:10 IST)
पुराणानुसार बृहस्पती सर्व देवांचे गुरु आहे. गुरु बृहस्पती सत्याचे प्रतीक आहे त्यांना ज्ञान, सन्मान आणि विद्वत्तेचे प्रतीक मानले आहे. गुरु हे बुद्धी आणि वाक शक्तीचे स्वामी आहे. ह्यांचे वडील महर्षी अंगिरा ,आईचे नाव सुनीमा बहिणीचे नाव 'योग सिद्धा' आहे.
 
देवांचे अधिष्ट इंद्र,गुरु, बृहस्पती आणि विष्णू परम देव आहे. दुसरीकडे दैत्याचे प्रमुख  हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपच्या नंतर विरोचन बनले ज्यांचे गुरु शुक्राचार्य आणि शिव परम इष्ट आहे. एकीकडे देवांचे महाल, शस्त्रे इत्यादींचे निर्मिते विश्वकर्मा होते आणि दुसरीकडे असुरांचे मयदानव. इंद्राचे भाऊ वरुणदेव हे देव आणि असुरांना प्रिय आहे.
 
अंगीरा देव ह्यांच्याशी ऋषीमारीचची मुलगी सुरुपा आणि ऋषी कर्दम ह्यांची मुलगी स्वराट आणि  ऋषी मनू ह्यांची  मुलगी पथ्या ह्या तिघींचे लग्न झाले. सुरूपाच्या गर्भातून बृहस्पती,स्वराट पासून गौतम,प्रबंध, वामदेव, उतथ्य आणि उशीर हे 5 मुलं झाले. पथ्याच्या गर्भातून विष्णू, संवर्त , विचित,अयास्। असिज,दीर्घतमा,सुंधवा हे 7 मुलं झाली. ऋषी उतथ्य पासून शरद्वान, वामदेव पासून बृहदूकथ्य झाले. महर्षी सुंधवा चे ऋषी विम्भा आणि बाज हे 3 मुलं झाली. हे ऋषी पुत्र सारथी मध्ये कुशल होते. कर्णाचे वडील देखील सारथी होते. अशा प्रकारे प्रत्येक युगात जातीचं उदय आणि  पतन कर्माच्या आधारे होते.
 
ऋषी बृहस्पती -अंगिराचे मुलं अंगिरस म्हणवले. अंगिरस हे अंगिरावंशी देवांचे गुरु बृहस्पती आहे. ह्यांचे 2 भाऊ उतथ्य आणि संवर्त ऋषी आणि अथर्वा जे अथर्व वेदचे कर्ते आहे, हे देखील आंगिरस आहे. महर्षी अंगिराचे सर्वात विद्वान मुलं  ऋषी बृहस्पती होते.
महाभारताच्या आदिपर्वानुसार बृहस्पती महर्षी अंगिराचा मुलगा आणि देवांचे गुरु आहे. बृहस्पती ह्यांचा मुलगा कच होते ज्यांनी शुक्राचार्या कडून संजीवनी विद्या शिकली. देवगुरु बृहस्पती ह्यांच्या एका बायकोचे नाव शुभा आणि दुसऱ्या बायकोचे नाव तारा आहे. शुभापासून 7 मुली झाल्या -भानुमती,राका, अर्चिष्मती, महामती, महिष्मती,सीनिवाली आणि हविष्मती. तारा पासून 7 मुलं आणि 1 मुलगी झाली. त्यांची तिसरी बायको ममता पासून त्यांना भारद्वाज आणि कच नावाचे 2 मुलं झाले. बृहस्पतीचे अधिदैवत इंद्र आणि प्रत्याधिदेव ब्रह्मा आहे.
 
भारद्वाज ह्यांचे वडील बृहस्पती आणि आई ममता होत्या. ऋषी भारद्वाजच्या नऊ मुलांचे नाव - ऋजिष्वा, गर्ग, नर, पायु, वसु, शास, शिराम्बिठ, शुनहोत्र, सप्रथ आणि सुहोत्र असे. ह्यांना 2 मुली होत्या रात्री आणि कशिपा . अशा प्रकारे ऋषी भारद्वाज ह्यांना 12 अपत्य होते. ब्राह्मण,क्षत्रिय, वैश्य आणि दलित समाजातील बरेच लोक भारद्वाज गौत्र लावतात. ते सर्व भारद्वाज कुळाचे आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हरिद्वारमध्ये महाकुंभाची जय्यत तयारी सुरू