अक्षयतृतीयेचा दिवस असे. महाराज मुलांबरोबर खेळत असे. दुपारची वेळ होती. महाराजांना चिलीम ओढायची इच्छा झाली. मुलांनी महाराजांना चिलीम भरून दिली पण चूल पेटवायला बराच काळ होता.
महाराज म्हणाले, ''आपल्या गल्लीतील जानकीराम सोनाराकडून विस्तव आणा. त्याचाकडे विस्तव नक्की असणार. कारण दुकान चालवण्यासाठी आधी विस्तव लागते. मुले जानकीराम सोनाराकडे आली आणि महाराजांच्या चिलीमसाठी विस्तव मागू लागली. अक्षयतृतीयेचा दिवस वऱ्हाडात सण म्हणून साजरा केला जातो म्हणून जानकीराम म्हणाला, ''चला पळा. सणाच्या दिवशी मी कोणालाही विस्तव देणार नाही.'' मुलांनी सोनाऱ्याला आपापल्या परीने सांगून बघितले. गजानन महाराज साधुपुरुष आहे. त्यांच्यासाठी विस्तव दिल्यास आपले चांगले होईल पण जानकीरामने या अपरोक्ष महाराजांची थट्टा करण्यास सुरु केले.
जानकीराम म्हणाला, ''एवढेच साधुपुरुष आहेत ते त्यांना माझ्या विस्तवाची काय गरज, ते जर साक्षात्कारी आहेत आपल्या स्वतः च्या शक्तीने विस्तव निर्माण करावे.'' विस्तव न मिळ्याल्याने मुलांना वाईट वाटले. ती परत आली. मग गजानन महाराजांना घडलेली हकीकत सांगितले.
तेव्हा गजानन महारजांनी हास्यवदन करत म्हटले बरं आपल्याला त्यांच्या विस्तवाची गरज नाही. चिलीम हातात धरुन त्यांनी बंकटलालला बोलाविले. त्यांनी त्याला चिलमीवर काडी धरण्यास सांगितले. बंकटलालने काडी धरली आणि काय चमत्कार ! त्या काडीचाच जाळ झाला आणि चिलीम पेटली. मुले आश्चर्याने थक्क झाली. ह्या चमत्काराचे सर्वांना कळले. सर्वाना आश्चर्य वाटले. जानकीराम सोनाराला चिलमीला विस्तव न दिल्या बद्दल पश्चाताप झाला. त्याला महाराजांची योग्यता समजली. त्याने महाराजांचे पाय धरले.