Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

20 जून रोजी गायत्री प्रकटोत्सव, Gayatri Mantra संबंधी 11 खास गोष्टी

20 जून रोजी गायत्री प्रकटोत्सव, Gayatri Mantra संबंधी 11 खास गोष्टी
, बुधवार, 16 जून 2021 (10:16 IST)
सन 2021 मध्ये गायत्री प्रगटोत्सव रविवार, 20 जून रोजी साजरा केला जात आहे. शास्त्रांमध्ये गायत्रीच्या वैभवाचे पवित्र वर्णन आढळतं. गायत्री मंत्र म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा सार. ऋषी-मुनि मुक्त आवाजाने गायत्रीचे गुणगान गातात. सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये, गायत्रीचा गौरव एका स्वरात बोलला गेला. गायत्री मंत्र हा हिंदू धर्मातील सर्वोत्तम आणि उत्कृष्ट मानला जातो. हा एक मंत्र आहे जो केवळ हिंदू धर्मावर विश्वास ठेवणार्‍यांच्या जिभेवरच राहतो असे नाही तर इतर धर्मातील लोकांनाही या मंत्राची जाणीव आहे. अनेक संशोधनात असे मानले जाते की गायत्री मंत्राचा जप केल्यास बरेच फायदे होतात.
 
चला गायत्री मंत्रांच्या 11 खास गोष्टी जाणून घेऊया-
 
हिंदू धर्मात गायत्री मंत्राला सर्वश्रेष्ठ आणि उत्तम मानले गेले आहेत. हे एकमेव मंत्र आहे जो हिंदू धर्मावर विश्वास ठेवणाऱ्यांचा तोंडी नव्हे तर अन्य धर्माचे लोकांना देखील ह्याची माहिती आहे. बऱ्याच संशोधनामध्ये हे मानले आहे की गायत्रीच्या मंत्राचा जप केल्याने बरेच फायदे होतात.
चमत्कारी गायत्री मंत्र :
- ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्।।
 
1 वेदांची संख्या एकूण 4 आहे आणि चारही वेदांमध्ये गायत्री मंत्राचा उल्लेख केलेला आहे. या मंत्राचे ऋषी विश्वामित्र आहे आणि देव सवितृ होय.
2 या मंत्रात अशी शक्ती आहे की नियमित तीन वेळा या मंत्राचा जप करणाऱ्यांच्या जवळ पास कोणतीही नकारात्मक शक्ती, भूत-प्रेत आणि वरची बाधा येत नाही.
3 गायत्री मंत्राच्या जप केल्याने अनेक प्रकारे फायदे होतात. हा मंत्र सांगतो की आपण त्या प्राणस्वरूप, दुःखनाशक आनंदी, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, निराकार देवाला आपल्या मनात ठेवले पाहिजे. देव आमच्या बुद्धीला सन्मार्गाकडे वळण्याची प्रेरणा देवो.
4 या मंत्राचा जपामुळे बौद्धिक क्षमता आणि बुद्धिमत्ता वाढते. ज्यामुळे माणसाचे तेज वाढते आणि सर्व दुःख पासून मुक्त होण्याचा मार्ग देखील सापडतो.
5 गायत्री मंत्राचा जप सूर्योदयाच्या दोन तासांपूर्वी पासून घेऊन सूर्यास्ताचा एक तासापर्यंत करता येतो.
6 मनातल्या मनात देखील हे जप कधीही करू शकतो पण या मंत्राचे जप रात्री करू नये.
7 रात्रीच्या वेळी गायत्री मंत्राचे जप केल्याने फायदा होत नाही तर याचा उलटच परिणाम होतो. किंवा काही चुकीचे परिणाम होऊ शकतात. त्यासाठी ही चूक अजिबात करू नये. रात्रीच्या सुमारास गायत्री मंत्राचा जप करू नये.
8 गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षरे असतात जे 24 सिद्धशक्तीचे प्रतीक आहे. हेच कारण आहे की ऋषींनी गायत्री मंत्राला भौतिक जगातील सर्व प्रकारच्या इच्छापूर्ण करणारे मंत्र सांगितले आहे.
9 आर्थिक अडचणी बाबतीत गायत्री मंत्र बरोबर श्री चा जप केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात.
10 विद्यार्थ्यांसाठी हा मंत्र खूप फायदेशीर आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले की गायत्रीमंत्र हा सुज्ञानाचा मंत्र आहे. म्हणूनच ह्याला मुकुटमणी (मंत्राचा मुकुट) असे ही म्हणतात.
11 नियमित रूपानं 108 वेळा गायत्रीमंत्राचा जप केल्याने बुद्धिमत्ता आणि कोणत्याही विषयाला दीर्घकाळा पर्यंत आठवण ठेवण्याची क्षमता वाढते. हा मंत्र एखाद्याची बुद्धिमत्ता आणि विवेकाला उजळविण्याचे कार्य करतो.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हनुमानजींनी असा चमत्कार केला की जगन्नाथ मंदिरात समुद्राचा आवाज येत नाही