गुरुवारच्या ह्या 5 उपायांनी बनतील मांगलिक कार्याचे योग

बृहस्पतिला देवतांचा गुरु मानले गेले आहे. याची पूजा केल्याने विवाहात येत असलेल्या अडचणी दूर होतात. म्हणून गुरुवारच्या पूजेचं विशेष महत्व आहे.
 
1. गुरुवारी केळीच्या झाडावर जल अर्पित करुन शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गुरुच्या 108 नावांचे उच्चारण करावे. असे केल्याने लवकरच जीवनसाथीदाराचा शोध पूर्ण होतो.
 
2. शीघ्र विवाहासाठी बृहस्पतिवारी उपास करावा आणि या विशेष रूपाने या दिवशी पिवळे वस्त्र नेसावे. आहारात देखील पिवळ्या रंगाचे पदार्थ सामील करावे.
 
3. व्यवसायात अडथळे येत असल्यास गुरुवारी देवघरात हळदीची माळ लटकवावी. आपल्या कार्यस्थळी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करावा. तसेच भगवान लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात लाडूचा नैवेद्य दाखवावा.
 
4. घरातनू दारिद्रय दूर करण्यासाठी गुरुवारी कुटुंबातील सदस्य विशेषकर स्त्रियांनी केस धुऊ नये. तसेच या दिवशी नखे कापू नये.
 
5. नोकरीत प्रमोशन होत नसेल किंवा रोजगार संबंधी अडचणी येत असल्यास गुरुवार एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू जसे खाद्य पदार्थ, फळं, कपडे इतर वस्तू दान कराव्या.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख सिद्धयोगी गजानन महाराज