Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

Guruwar upay गुरुवार वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

Guru Purnima Puja Muhurat
गुरुवार : हा दत्ताचा व गुरूचा वार आहे. या दिवशी दत्तात्रेय स्रोत वगैरे वाचतात. एक वेळचा उपवास करतात. सकाळी किंवा संध्याकाळी सोडतात. दत्त हे आद्यगुरू असल्यामुळे आपल्या गुरुलाच प्रत्यक्ष दत्त समजून सर्व उपचार करावे. पुष्कराज हे गुरुचे रत्नं आहे. पिवळ्या रंगाचे हे चमकणारे रत्नं धारण केल्यास यश व आनंद देते. गुरुवारी दत्त महाराजांची उपासना केली जाते. गुरुवारी केळ्याचा झाडाचें पूजन पण केले जाते. केळ्याच्या झाडाला पाणी घालून त्याला गूळ आणि चणा डाळ वाहतात. या दिवशी पिवळे वस्त्र धारण करायचे असतात. तसेच पिवळे गुरुवार चा उपास केला असेल तर पिवळेच खायचे असतात. 
 
श्रीगुरुपादुकाष्टक
ज्या संगतीनेंच विराग झाला। मनोदरींचा जडभास गेला ।
साक्षात् परात्मा मज भेटविला। विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १ ॥
सद्योगपंथें घरि आणियेलें। अंगेच मातें परब्रह्म केलें ।
प्रचंड तो बोधरवि उदेला। विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ २ ॥
चराचरीं व्यापकता जयाची। अखंड भेटी मजला तयाची ।
परं पदीं संगम पूर्ण झाला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ३ ॥
जो सर्वदा गुप्त जनांत वागे। प्रसंन्न भक्ता निजबोध सांगे ।
सद्भक्तिभावांकरितां भुकेला। विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ४ ॥
अनंत माझे अपराध कोटी ।
नाणी मनीं घालुनि सर्व पोटीं ।
प्रबोध करितां श्रम फार झाला ।
विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ५ ॥
कांहीं मला सेवनही न झालें ।
तथापि तेणें मज उद्धरीलें ।
आता तरी अर्पिन प्राण त्याला ।
विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ६ ॥
माझा अहंभाव वसे शरीरीं ।
तथापि तो सद्गुरु अंगिकारीं ।
नाहीं मनीं अल्प विकार ज्याला ।
विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ७ ॥
आतां कसा हा उपकार फेडूं ।
हा देह ओवाळुनि दूर सांडूं ।
म्यां एकभावें प्रणिपात केला । 
विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ८ ॥
जया वानितां वानितां वेदवाणी ।
म्हणे ' नेति नेतीति ' लाजे दुरुनी ।
नव्हे अंत ना पार ज्याच्या रुपाला ।
विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ९ ॥     
जो साधुचा अंकित जीव झाला ।
त्याचा असे भार निरंजनाला ।
नारायणाचा भ्रम दूर केला ।
विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १० ॥
॥ इति गुरुपादुकाष्टक संपूर्ण ॥ 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी