कलयुगात हनुमानाची भक्ती सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. हनुमानाची सतत भक्ती केल्याने भूत-प्रेत, शनी आणि ग्रह बाधा, रोग आणि शोक, कोर्ट-कचेरी- बंधनापासून मुक्ती, मारण-सम्मोहन-उच्चाटन, अपघातापासून बचाव, मंगल दोष, कर्ज मुक्ती, बेरोजगार आणि तनाव किंवा चिंता मुक्ती होते. विशेष दिन आणि विशेष वेळेवर हनुमानाची पूजा, साधना किंवा आराधना केल्याने ते लगेच प्रसन्न होतात.
1. शनिवारी सुंदरकांड पाठ करावे. शनिवारी सुंदरकांड किंवा हनुमान चालीसा पाठ केल्याने शनी देव आपल्याला लाभ प्रदान करतात. शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाला कणकेचा दिवा लावावा.
2. मंगळवारी हनुमान पूजा, आराधना किंवा हनुमान चालीसा वाचल्याने सर्व प्रकाराचे संकट दूर होऊन मंगल दोष नाहीसा होतो. कोणत्याही मांगलिक कार्याच्या सिद्धीसाठी किंवा कर्ज मुक्तीसाठी मंगळवारी त्यांची आराधना केली पाहिजे.
3. मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला व्रत केल्याने आणि हनुमान-पाठ, जप, अनुष्ठान केल्याने त्वरित फल प्राप्ती होते.
4. हनुमान जयंतीला विशेष आराधना केली पाहिजे. पहिली चैत्र शुक्ल पौर्णिमा आणि दुसरी कार्तिक कृष्ण चतुर्दशीला हनुमान जयंती साजरी केली जाते. दोन्ही दिवस सर्वश्रेष्ठ आहे. एक तिथी जन्मदिवस रूपात तर एक विजय अभिनन्दन महोत्सव रूपात साजरी करावी. या दिवशी हनुमानाने सूर्यला फळ समजून खाण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा राहू देखील सूर्याला आपला ग्रास बनविण्याच्या प्रयत्नात होता तेव्हा हनुमानाला बघून सूर्यदेवाने त्यांना दुसरा राहू समजले. तेव्हा चैत्र पौर्णिमा होती. या दिवशी हनुमान पूजा केल्याने सर्व संकट टळतात आणि मनुष्य निडर होतो.
5. या व्यतिरिक्त हनुमानाची पूजा पौर्णिमा आणि अमावस्याला विशेष रुपाने केली जाते. या दिवशी आराधना केल्याने भीती, चंद्रदोष, देवदोष, मानसिक अशांती, भूत-प्रेत आणि सर्व प्रकाराच्या अपघातांपासून मुक्ती मिळते.