Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 March 2025
webdunia

रुद्राक्ष आणि आरोग्य

रुद्राक्ष आणि आरोग्य

वेबदुनिया

'रुद्राक्ष' तन आणि मनाचे आजार दूर करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण आहे. रूद्राक्ष धारण केल्याने हृदयाची ठोके व रक्ताभिसरण नियंत्रणात राहते. तसेच रुद्राक्ष धारण करणार्‍या व्यक्तीला लवकर वृध्दत्त्व येत नाही.

रुद्राक्षासंबंधित मह‍त्त्वपूर्ण गोष्टी
* कधीही दुसर्‍या व्यक्तीच्या गळ्यातले रूद्राक्ष धारण करू नये.
* रुद्राक्ष नेहमी चांदी, सोने, तांबे किंवा पंचधातुमध्ये गळ्यात धारण केला पाहिजे.
* रुद्राक्ष धारण केल्याने एकाग्रता व स्मरणशक्ती वाढत असते.
* रुद्राक्ष धारण केलेल्या व्यक्तीला धारण केल्यापासून 40 दिवसात व्यक्तिमत्वात परिवर्तन दिसून येते.

खरे रुद्राक्ष कसे ओळखाल?
* रुद्राक्ष खरे आहे किंवा खोटे आहे, हे तपासण्यासाठी त्याला एका पाण्‍याने भरलेल्या ग्लासात ठेवा. जर रुद्राक्ष पाण्यात डुंबून गेला असे तर तो खरा आहे हे समजावे. व जर तो पाण्यात तरंगत असेल तर तो खोटा नकली आहे.
* रुद्राक्ष 6 तास पाण्यात उकळावे. खर्‍या रूद्राक्षाचा रंग खराब हलका पडत नाही.
* रुद्राक्ष खंडीत झालेला नसावा.
* लहान आकारातील रुद्राक्ष खूप शुभ मानले जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जर घरात नेगेटिव एनर्जी असेल तर सांगेल हा 'टोटका'