Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तप म्हणजे काय!

webdunia
कोणाच्या मनाला न दुखविणारे, सत्य, प्रिय व हितकारक असे भाषण, तसेच अखंड ज्ञानोपासनेत राहणे, हे वाणीचे तप होय. एखादा गुण अंगी बाणवण्यासाठी जाणीवपूर्वक, पध्दतशीर रीतीने प्रयत्नकरणे म्हणजे 'तप' होय. जुन्या
काळात चार महिने (चातुर्मास) एखादे 'व्रत' घेत. 'मी अमके-तमके चार महिने करीन!'- व्रताचरणाने जाणीवपूर्वक, निष्ठेने तो गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न होई.' तपाचा काळ बारा वर्षांचा मानला आहे. एखादा गुण आग्रहपूर्वक बारा वर्षे आपणात उतरविण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे ताप! बारा वर्षे त्याच गुणाचा पाठपुरावा केलेला असेल, तर मग तो 'स्वभाव' बनून जातो. मग 'प्रयत्न करावा लागत नाही. (प्रयत्नशैथिल्यात्! - असे योगसूत्र आहे.) असे झाले म्हणजे तप पूर्ण झाले.
 
कोणाच्या मनाला न दुखविणारे, सत्य, प्रिय, हितकर बोलणे हा वाणीचा स्वभाव बनवण्यासाठी आपले अंत:करण साधे, सरळ व आपणापेक्षा दुसर्‍याच्या हिताची कळकळ बाळगणारे हवे. दुसर्‍याबद्दल आपुलकी हवी, म्हणजे भाषा आपोआप सौम्य होते. ज्ञानोपासनेचाही जाणीवपूर्वक छंद लावून घ्यावा लागतो, हा स्वभाव झाला म्हणजे 'वाणीचे तप' झाले.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

Hindu Dharma : तेहतीस कोटी देव कोणते ?