1. माणसाने ईमानदारीने कमावलेल्या पैशांचा एक दशांश भाग चांगल्या कामांसाठी दान करावा. जो माणूस आपल्या पत्नी, मुलगा, किंवा कुटुंबातील इतरांना दुखी करुन दान करतो ते दान जिवंतपणे आणि मृत्यूनंतरही दुख देणारं ठरतं.
2. स्वत: जाऊन दिलेले दान उत्तम आणि घरी बोलावून दिलेले दान मध्यम प्रमाणात फलदायी असते. गायी, ब्राह्मण आणि आजारी लोकांना काही दिले जाते, त्या वेळी कोणी आपल्याला देऊ नका असा सल्ला दिला असल्यास दुःख सहन करावे लागतात.
3. तीळ, कुश, पाणी आणि तांदूळ यांचे दान हातात घेऊनच करावे, अन्यथा त्या दानावर राक्षसांचा ताबा येतो. पितरांना तिळासोबत, देवांना तांदूळासह दान करावे. पाणी आणि कुश यांचे संबंध सर्वत्र जपले पाहिजे.
4. देणाऱ्याने पूर्वेकडे तोंड करून दान द्यावे आणि घेणार्याने उत्तरेकडे तोंड करून ते स्वीकारावे, असे केल्याने देणाऱ्याचे आयुष्य वाढते आणि घेणार्याची आयु क्षीण होत नाही.
5. अन्न, पाणी, घोडा, गाय, वस्त्र, पलंग, छत्र आणि आसन या 8 वस्तूंचे दान केल्याने मृत्यूनंतरचे दुःख नष्ट होते.
6. गाय, घर, कपडे, पलंग आणि मुलगी एकाच व्यक्तीला दान करावी. आजारी लोकांची सेवा करणे, देवतांची पूजा करणे, ब्राह्मणांचे पाय धुणे हे गाय दान करण्यासमान आहे.
7. गरीब, अंध, दीन, अनाथ, मुके, अशक्त, अपंग आणि आजारी यांच्या सेवेसाठी दिलेला पैसा पुण्यात भर टाकतो.
8. अयोग्य ब्राह्मणांना दान घेऊ नये.
9. गाय, सोने, चांदी, रत्ने, शिक्षण, तीळ, मुलगी, हत्ती, घोडा, पलंग, कपडे, जमीन, अन्न, दूध, छत्री आणि आवश्यक साहित्यासह घर - या 16 वस्तू दान करण्यासाठी महादान असे म्हटले जाते.