Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

विजया एकादशी महत्त्व आणि पूजा विधी जाणून घ्या

Vijaya  Ekadashi 2025
, सोमवार, 24 फेब्रुवारी 2025 (10:38 IST)
Vijaya Ekadashi 2025:एकादशी तिथि शुभ असून पद्मपुराण नुसार भगवान शकरांनी नारदमुनी यांना उपदेश करतांना सांगितले होते की, जो व्यक्ती विजया एकादशीचे व्रत करतो त्याच्या पूर्वजांना स्वर्गात स्थान प्राप्त होते. तसेच या व्रताचे नियम पाळल्याने कामात यश प्राप्त होते. अशी मान्यता आहे.
विजया एकादशी महत्त्व
1. विजया एकादशी व्रत केल्याने अतिशय गंभीर आजरापासून देखील मुक्ती मिळते.
 
2. हे व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो अर्थात कधी शत्रूपासनू पीडा होत नाही. ही एकादशी आपल्याला नावाप्रमाणे फल प्रदान करते. या दिवशी व्रत धारण केल्याने व्यक्तीला इच्छित फल प्राप्ती होते आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्ती होते.
3. एकादशी व्रत केल्याने चंद्र ग्रह शुभ होऊन चांगलं फल देतं, ज्याने व्यक्ती मानसिक रुपाने निरोगी राहतो.
 
4. एकादशी व्रत केल्याने व्यक्तीचे अशुभ संस्कार नष्ट होतात. ही एकादशी सर्व पापांचे हरण करणारी तिथी असल्याचे म्हटले गेले आहे.
 
5. पुराणांनुसार जी व्यक्ती एकादशी व्रत करतात त्यांच्या जीवनात कधीही संकटं येत नाही आणि धन आणि समृद्धी नांदते. हे व्रत जीवनात यश मिळवण्यिासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी केलं जातं.
 
7. पौराणिक मान्यतानुसार या दिवशी व्रत केल्याने पूजेचं तीनपट फल मिळतं.
 
8. लंकावर विजय मिळविण्यासाठी प्रभू श्रीराम यांनी याच दिवशी समुद्र काठी पूजा केली होती.
 
9. विजया एकादशीला श्रीराम आणि त्यांच्या सेनेद्वारा व्रत ठेवण्याची कथा श्रीकृष्‍णाने युधिष्ठिरला ऐकवली होती.
 
10. पद्मपुराण या अनुसार या एकादशीला व्रत ठेवल्याने व्यक्तीवर कोणत्याही प्रकाराचे संकट येत नसून सर्व कार्य सोपारीत्या पूर्ण होतात.
 
पूजाविधी-  धूप, दिवा, अगरबत्ती, तूप, कुंकू, अक्षता, नैवेद्य, मिठाई, फळ, फूल, पंचामृत, 
सकाळी लवकर उठून रोजचे कार्य झाल्यानंतर देवघर स्वच्छ करावे. तसेच भगवान श्रीहरि विष्णूंची आराधना करावी. यादिवशी व्रताचा संकल्प करून गंगाजल, जल, पिवळी फूले, पंचामृत, पिवळे चंदन हे भगवान श्रीहरि विष्णूंना अर्पण करावे. तसेच नैवेद्यात तुळशीचे पाने ठेवून मग नैवेद्य दाखवावा व प्रसाद सर्वांना वाटावा. यामुळे भगवान श्रीहरि विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्ती होते.
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोमवारी पूजा करताना महादेवाच्या या मंत्राचा जप करावा