Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mahalaxmi pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय

Mahalaxmi pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी  शुक्रवारी करा हे 4 उपाय
, गुरूवार, 20 एप्रिल 2023 (23:01 IST)
शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी भक्तिभावाने देवी लक्ष्मीची पूजा करणार्‍यांवर देवी प्रसन्न होऊन भरभराटीचा आशीर्वाद देते. लक्ष्मीचा वास घरात असावा अशी इच्छा बाळगणार्‍यांनी शुक्रवारी लक्ष्मी देवीची आराधना करावी. शुक्रवारी काही सोपे उपाय करुन देवीला प्रसन्न करता येऊ शकतं.
 
शुक्रवारी देवीची कृपा मिळविण्यासाठी हे उपाय केल्याने धन-धान्याची कधीच कमी भासत नाही. जाणून घ्या असे उपाय ज्याने लक्ष्मी देवी आपल्या घरी वास करेल.
 
शुक्रवारी देवीला लाल वस्त्र अर्पित करावे. आपण महालक्ष्मी मंदिरात जाऊन लाल वस्त्र, लाल बांगड्या, लाल कुंकु, आणि मेंदी अर्पित करावी. असे केल्याने देवीची असीम कृपा प्राप्त होते.
 
पाच लाल रंगाचे फुलं घ्यावे. आपण गुलाबाचे फुलं देखील घेऊ शकता. हे फुलं हातात ठेवून देवी लक्ष्मीचे ध्यान करावे. देवीला प्रार्थना करावी की घरात धन-धान्याच्या रुपात नेहमी विराजित राहावी. नंतर ते पाची फुलं आपल्या तिजोरीत किंवा पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे.
 
शुक्रवारी संध्याकाळी स्नान करुन पवित्र व्हावे. एका चौरंगावर लक्ष्मी नारायणाची मूर्ती स्थापित करावी. नंतर श्री लक्ष्मी नारायण हृ्दय स्त्रोताचे भक्तिभावाने पाठ करावे. पाठ केल्यानंतर लक्ष्मी नारायणाला खीरीचा नैवेद्य दाखवावा. सोबतच एखाद्या कन्येला पैसे दान करावे.

श्री लक्ष्मी नारायण हृदय स्त्रोत

एक लाल रंगाचा कपडा घ्यावा. त्यात सव्वा किलो तांदूळ ठेवावे. तांदूळ अखंड असावे. त्याची पोटली तयार करावी. नंतर पोटली हातात घेऊन ओम श्रीं श्रीये नम: याच्या पाच माळी जपाव्या. नंतर ही पोटली तिजोरीत ठेवावी. याने अपार धन-संपत्तीची प्राप्ती होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ganga Saptami 2023: गंगा सप्तमीला करा हे उपाय... पितर होतील प्रसन्न! महत्त्व आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या