हवन करताना स्वाहा का म्हटले जाते हे अनेक लोकांना ठाउक नसेल. खरं तर अग्निदेवांची पत्नी स्वाहा असे. म्हणून प्रत्येक हवनामध्ये मंत्र म्हटल्यावर स्वाहा असं उच्चार केलं जातं.
स्वाहाचा अर्थ आहे योग्य पद्धतीने देणे. थोडक्यात दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास एक अत्यावश्यक वस्तूला दुसऱ्या पर्यंत पोहोचविणे.
श्रीमद्भागवत आणि शिव पुराणात स्वाहाशी निगडित वर्णन केले आहे. मंत्र पठण करताना स्वाहा म्हणून भगवंताला हवन साहित्य अर्पण केले जाते.
हवन किंवा कोणतीही धार्मिक विधीमध्ये मंत्र पठण करताना स्वाहा म्हणून देवाला हवनाचे साहित्य अर्पण केलं जातं. पण मंत्राच्या शेवटी स्वाहा बोलण्याच्या मागे काय अर्थ दडलेला आहे ह्याचा विचार आपण कधी केला आहे का?
खरं तर हवन साहित्य अर्पण केल्याशिवाय कोणतेही यज्ञ पूर्ण रूपाने यशस्वी मानले जात नाही. स्वाहा म्हटल्यावर ते हवन साहित्य अग्नीला अर्पण करतो. श्रीमद्भगवत आणि शिव पुराणात स्वाहाशी निगडित वर्णन केले गेले आहे. या शिवाय ऋग्वेद, यजुर्वेद सारख्या वैदिक ग्रंथामध्ये अग्नीच्या महत्वानुसार अनेक सूक्त निर्मित केले आहे.
पौराणिक दंतकथा -
पौराणिक कथेनुसार स्वाहा दक्ष प्रजापतींची कन्या असे. त्यांचे लग्न अग्निदेवांसोबत झाले होते. अग्निदेव स्वाहाचा द्वारे हविष्य ग्रहण करतात आणि त्यांचा माध्यमाने हविष्य आव्हान केलेल्या देवाला मिळते. अग्निदेवांच्या पत्नी स्वाहा यांना पावक, पवमान, आणि शुची असे तीन मुले होतात.
अजून एक कथा स्वाहाशी निगडित आहे. स्वाहा ही निसर्गाची कला असे. देवांच्या आग्रहामुळे अग्निदेवांशी त्यांचं लग्न झालं होतं. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः स्वाहाला वर दिले होते की फक्त तिच्या मार्फतच देव हविष्य ग्रहण करु शकतील. यज्ञात पूर्णता तेव्हा होते ज्या वेळी आव्हान करुन बोलवलेल्या देवांना त्यांच्या आवडीच्या नैवेद्य दिला जातो.