Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 24 April 2025
webdunia

श्रीकृष्णांचे किती गुरु होते, त्यांच्या शक्तीचे गुपित जाणून हैराण व्हाल

sri krishna
, बुधवार, 13 मे 2020 (07:22 IST)
भगवान श्रीकृष्णाने आपल्या आयुष्यात प्रत्येकाकडून काही न काहीतरी शिकवण घेतलीच आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेकांना आपले गुरु मानले आहे. ह्याच गुरुंपासून त्यांना अपार सामर्थ्य प्राप्त झाले असे. चला तर मग हे गुपित जाणून घेऊ या...
 
1 सांदिपनी : भगवान श्रीकृष्णाचे पहिले गुरु सांदिपनी असे. त्यांचे आश्रम अवंतिका (उज्जैन) येथे असे. देवतांच्या ऋषींना सांदिपनी असे म्हणतात. सांदिपनी हे श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामांचे गुरु असे. त्यांचा कडूनच श्रीकृष्णाने वेद आणि योगाची शिक्षा दीक्षा सह 64 कलांचे शिक्षण देखील घेतले. सांदिपनी गुरुंनी गुरु दक्षिणे मध्ये आपल्या मुलाची मागणी केली. जो शंखासुर राक्षसांकडे बंदी होता. श्रीकृष्णाने त्याला शंखासुराच्या तावडीतून मुक्त करून आपल्या गुरुला गुरु दक्षिणा अर्पण केली. 
 
2 नेमीनाथ : अशी आख्यायिका आहे की श्रीकृष्णाने जैन धर्मातील 22 व्या तीर्थंकर गुरु नेमिनाथांकडून सुद्धा ज्ञान घेतले आहे. हिंदू आणि जैनांच्या पुराणात नेमीनाथांबद्दलची माहिती स्पष्ट रूपाने आढळते. शौरपुरी (मथुरा)चे यदुवंशी राजा अंधकवृष्णीचा थोरला मुलगा समुद्रविजय यांचे मूल नेमीनाथ होय. अंधकवृष्णिच्या सर्वात लहान पुत्र वासुदेव यांच्यापासून भगवान श्रीकृष्ण अवतरण झाले. अश्या प्रकारे नेमीनाथ आणि श्रीकृष्ण दोघे चुलता भाऊ असे. त्यांचा आईचे नाव शिवा असे. 
 
3 घोर अंगीरस : श्रीकृष्णाचे तिसरे गुरु घोर अंगीरस होय. असे म्हटले जाते की घोर अंगिरसाने जे ज्ञान श्रीकृष्णाला दिले होते तेच ज्ञान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रात दिले होते जे गीतेच्या नावाने प्रसिद्ध झाले. छांदोग्य उपनिषेदात आढळून येते की देवकीनंदन श्रीकृष्ण घोर अंगिरसाचे शिष्य असे. त्यांनी आपल्या गुरुंकडून असे ज्ञान मिळवले आहे जे मिळवल्यानंतर काहीही शेष राहत नाही.
 
4 महर्षी वेदव्यास : असे ही म्हणतात की त्यांनी महर्षी वेदव्यासांकडून बरंच काही शिकले होते. पांडू, धृतराष्ट्र आणि विदुर हे महर्षी वेदव्यासांचेच मुलं होय. वेदव्यास हे महाभारताचे निर्माते होते. ते बऱ्याचशा दैवीय शक्तीने संपन्न होते. 
 
5 भगवान परशुराम : भीष्म पितामह, गुरुवर द्रोण आणि अंगराज कर्ण हे तिघे परशुरामांचे शिष्य असे. श्रीकृष्णांकडे अनेक प्रकारचे दिव्यास्त्र असे. असे म्हणतात की भगवान परशुरामानेच त्यांना सुदर्शन चक्र दिले असे. दुसरीकडे त्यांना पाशुपतास्त्र चालवणे सुद्धा ठाऊक असे. पाशुपतास्त्र शंकरा नंतर श्रीकृष्णा आणि अर्जुनाकडे असे. या व्यतिरिक्त त्यांचा कडे प्रस्वपास्त्र देखील असे. जे शिव, वसुगण आणि भीष्माकडेच असे. या व्यतिरिक्त त्याच्यांकडे त्यांची स्वतःची नारायणी सेना आणि नारायणास्त्र असे. 
 
शक्तीचे स्रोत : 
शेवटी भगवान श्रीकृष्ण यांचे देव असणे हेच त्यांचे सामर्थ्य होय. ते भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी 8 वे अवतार होते. 24 अवतारांपैकी त्यांचा 22 वा नंबर असे. त्यांना आपल्या जीवनाच्या मागील आणि पुढील आयुष्याचा सर्व गोष्टी लक्षात होत्या. सर्व अवतारांमधील त्यांना पूर्णावतार मानले जाते. 
 
भगवान श्रीकृष्ण 64 कलेमध्ये पारंगत होते. त्यांच्याकडे सुदर्शन चक्र होते आणि ते सर्वश्रेष्ठ धनुर्धरही होते. द्वंद्व युदधामध्ये ते पारंगत होते. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे अनेक अस्त्र शस्त्र होते. त्यांच्या धनुष्याचे नाव सारंग होते. त्यांचा खड्गाचे नाव नंदक, गदेचे नाव कौमोदिकी आणि शंखाचे नाव पांचजन्य असे हे गुलाबी रंगाचे होय. श्रीकृष्णाकडे असणार्‍या रथाचे नाव जैत्र आणि गरुडध्वज असे होते. त्यांच्या सारथीचे नाव दारूक होते आणि त्यांच्या घोड्यांची नावे शैव्य, सुग्रीव, मेघापुष्प आणि बलाहक कअसे होते.
 
जय श्री कृष्ण

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शुभ कार्यांमध्ये नारळ फोडण्याचे काय महत्त्व आहे, जाणून घ्या