महाभारताच्या द्यूतक्रीडेच्या वेळी सम्राट युधिष्ठिराने द्रौपदीला द्यूत मध्ये पणाला लावले. त्या द्युतामध्ये दुर्योधनाने आपल्या शकुनी मामाच्या साहाय्याने विजय मिळविला होता. त्यावेळी दुःशासनाने आपल्या थोरल्या भावाच्या सांगण्यावरून केसांनी धरून द्रौपदीला राज्यसभेत खेचत आणले होते. द्रौपदीचा हा असा अपमान होत असताना महाराज धृतराष्ट्र, भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, आणि विदुर यांसारखे महान लोकं निमूटपणे मान खाली घालून तिथे शांत बसलेले होते. नंतर त्यांना त्यांच्या शांत बसण्याची शिक्षा मिळालीच.
दुर्योधनाच्या आदेशावरून दुःशासनाने द्रौपदीची साडी संपूर्ण सभेच्या सामोरी काढण्यास सुरुवात केली असताना ही सर्व मान्यवर मंडळी गप्प बसून राहिले होते. पांडवांनादेखील द्रौपदीचा सन्मान वाचविणे शक्य नव्हते. त्यानंतर द्रौपदीने डोळे मिटले आणि श्रीकृष्णाचे ध्यान करून त्यांना मदतीसाठी बोलविले. श्रीकृष्ण त्यावेळी बैठकीत नव्हते.
द्रौपदी म्हणाली हे गोविंद आज श्रद्धा आणि अविश्वास यांच्यामध्ये युद्ध आहे. आज मला देव आहे की नाही हे बघावयाचे आहे.
मग श्रीकृष्णांनी एक चमत्कार केले. त्यांनी द्रौपदीची साडी दुःशासन ओढत असताना एवढी लांब केली की ती साडी ओढत ओढत दुःशासन बेशुद्ध होऊन पडून गेला. सर्वांनी ह्या चमत्काराला आपल्या डोळ्याने बघितले. अशी आख्यायिका आहे की श्रीकृष्णाने द्रौपदीची लाज वाचविण्या मागील 2 कारणं होती. पहिलं कारण म्हणजे की द्रौपदी श्रीकृष्णाची सखी असे. आणि दुसरं म्हणजे द्रौपदीने 2 चांगली कामे केली होती. जरी ही हे 2 कारणे नसती तरीही भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीची लाज वाचविली असती.
1 पहिले पुण्य कार्य -
एकदा द्रौपदी गंगेत स्नान करीत होती, त्याच वेळी एक साधू तेथे स्नान करण्यासाठी आले होते. अंघोळ करीत असताना त्या साधूचे वस्त्र पाण्यात वाहून गेले. त्या अवस्थेत बाहेर कसे निघणार त्यासाठी ते एका झुडुपाच्या मागे जाऊन बसले. द्रौपदीने त्या साधूंना अश्या अवस्थेमध्ये बघून आपल्या साडीतून त्यांना वस्त्र फाडून दिले. साधूने प्रसन्न होऊन द्रौपदीला आशीर्वाद दिले.
2 दुसरं पुण्य कार्य-
एका आख्यायिकेनुसार, शिशुपाल वध सुदर्शन चक्राने केल्यानंतर श्रीकृष्णाचे बोट ही कापले गेले होते. रक्त वाहतंय हे बघून द्रौपदी लगेच धावून आली आणि तिने आपल्या साडीचा कोपरा फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला. असे केल्याचे बघून श्रीकृष्ण द्रौपदीला आशीर्वाद देऊन म्हणाले की मी आपल्या या साडीची किंमत नक्कीच देईन.
या चांगल्या कर्मांमुळे श्रीकृष्णाने द्रौपदीची साडी व्याजासकट परत केली आणि द्रौपदीची लाज वाचविली. असे होते श्रीकृष्ण.