Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Kala Jadu: काला जादूबद्दल 5 गोष्टी

Kala Jadu: काला जादूबद्दल 5 गोष्टी
भारतात अतीत कालापासून जादू, टोना, भूत प्रेत इत्यादी गोष्टी नेहमी होत राहतात. येथे तंत्र विद्येला फार महत्त्व दिले जाते, अशिक्षित वर्ग जास्त करून या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतात. बर्‍याच लोकांचे मानणे आहे की त्यांच्या जीवनावर काला जादूमुळे फारच नकारात्मक प्रभाव पडला आहे. आजही काला जादू एक कोडे आहे. बर्‍याच धर्मांमध्ये जादू, काला जादू आणि टोना-टोटक्याला मानले जाते.  काला जादू करणार्‍या व्यक्तीला तांत्रिक म्हणतात वाईट कृत्य करून कोणावर जादू करून त्याचा नाश करू शकतो.  
 
काला जादूला हिंदू धर्मात जास्त मानतात  
हिंदू धर्म आणि काला जादू याचे मागील बर्‍याच युगांपासून संबंध आहे. याला करणार्‍या व्यक्तीला तांत्रिक किंवा अघोरी बाबा म्हणतात जो रात्रीच्या वेळेस विशेष पूजा करतो. हिंदू धर्मात हे जास्त करण्यात येते.  
 
ऊर्जा 
काला जादू शरीरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतो. ही शक्ती बाहेरील व्यक्तीकडून पाठवण्यात येते जी त्या व्यक्तीवर आंतरिक प्रभाव टाकते.  
 
तांत्रिक
तांत्रिक ज्या प्रकारे पूजा करतात, ते आज ही एक रहस्य आहे. प्रत्यक्षात तांत्रिक वाईट आत्म्याला बोलवतात आणि नंतर त्यांना चांगल्या आत्म्याला किंवा एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यास सांगतात. ज्या व्यक्तीला त्यांना त्रास द्यायचा आहे त्याचा एखादा कपडा, केस किंवा कुठलीही एखादी ओळख हवी असते. जर एकदा ही वाईट आत्म्याने त्रास देणे सुरू केले तर चांगला व्यक्ती देखील बरबाद होऊन जातो. 
 
काला जादूचा प्रभाव 
काला जादूचा प्रभाव फारच भीषण असतो. याच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या स्वभावात फार परिवर्तन येतो. त्याचे आरोग्य बिनकारण खराब होत जाते. बर्‍याच वेळा घरात तुळशीचे पानं वाळून जातात जेव्हाची त्यांच्याकडे फार लक्ष्य दिले जाते, किंवा प्रभावित व्यक्तीचे नखं आपोआपच काळे पडायला लागतात.   
 
वैज्ञानिक कारण 
काला जादू गैर वैज्ञानिक घटना नाही आहे. वैज्ञानिक रूपेण हे सिद्ध झाले आहे की एखाद्या बाहेरच्या व्यक्तीद्वारे कुणासाठी जास्त नकारात्मक विचार, त्या व्यक्तीवर खराब परिणाम पाडू शकतो आणि मानसिक स्वास्थ्याला प्रभावित करू शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चुकून महादेवाच्या पिंडीवर चढवू नये या वस्तू