Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खंडोबा भंडार मंत्र आणि भूपाळी

खंडोबा भंडार मंत्र आणि भूपाळी
, शनिवार, 7 डिसेंबर 2024 (06:12 IST)
प्रभावी मंत्र
ॐ र्‍हीं भ्रूं त्रूं स्त्रूं र्‍हूं ध्रूं प्रियाणानंद गंगामहालसाभ्यां सहिताय श्रीमार्तंडभैरवरुपाय
श्री मल्लारये नम: ।
भ्हयूं ध्रूं र्‍हूं स्त्रूं भ्रू र्‍हीं ॥
 
भंडारमंत्र
भंडार वाहताना म्हणावयाचा मंत्र
स्कंदनाभि समुद्भूते । श्री मैरालप्रियकरि ।
गौरीप्रिय तडिदगौरी । लक्ष्मीसुते नमस्तुते ॥

भूपाळी
उठी उठी हो मैराळा । मालो महिपती मल्हारी । अमृत भरोनि गंगा । तिष्टे रानांची झारी ॥धृ.॥१॥
इंद्रादिक सूर मिळोनि आले दरबारी । मृदंग कहाळ वाजविताती । पण वानक भरी ॥२॥
तुजविण नाही कोणी आम्हा । दुसरा कैवारी । मुख प्रक्षाळूनी देई । सुकृत प्रेमाची वारी ॥३॥
हळदीकेशरकर्दम करुनी गंधी । उटणे करु तिष्ठती दासीसिध्दी अष्टविधी । सनकादिक नारद गाती नाना प्रबंधी ।
ज्ञानार्कोदय झाला वेगी प्रबोधी ॥४॥
वस्त्रे अलंकार घेउनि तिष्ठती गण कोटी । जयजयकारे सुरवर करिती सुमनाची वृष्टी । ध्यानी त्याला देसी संतती, संपत्ती यश सृष्टी ।
दत्त वरद विठ्ठल कवि वंदीत गर्जुनि यळकोटी ॥५॥
ALSO READ: Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खंडोबाचा अभंग आणि गोंधळ