Kumbh Mela 2025: कुंभमेळा दर 3 वर्षांनी, अर्ध कुंभ दर 6 वर्षांनी आणि महाकुंभ दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो. 2013 मध्ये प्रयागमध्ये महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर 2019 मध्ये प्रयागमध्ये अर्ध कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आता 2025 मध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभ आयोजित केला जाणार आहे.
महासंगम महाकुंभ मेला 2025 : उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमध्ये 29 जानेवारी 2025 ला सिद्धि योगात महाकुंभाची सुरुवात होईल. हा हिंदू सनातन धर्माचा सर्वात मोठा उत्सव आणि मेळा आहे. या पवित्र मेळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून लाखो लोक येतात. हिंदू धर्मातील प्रत्येक विचारधारा आणि संप्रदाय या जत्रेत भेटतात. जणू काही हजारो नद्या एकाच ठिकाणी एकत्र आल्या आहेत. म्हणूनच याला महासंगम असेही म्हणतात. या महान संगमात न्हाऊन निघावे असे प्रत्येकाला वाटते. 29 जानेवारी ते 08 मार्च पर्यंत तुम्ही पवित्र गंगा नदीत स्नान करू शकता.
महाकुंभ 2025 शाही स्नान तारखा
13 जानेवारी: 13 जानेवारीपासून शाही स्नानाला सुरुवात होणार आहे. या दिवशी पौर्णिमा असेल.
14 जानेवारी : मकर संक्रांतीला शाही स्नानाचेही आयोजन करण्यात येणार आहे.
29 जानेवारी : या दिवशी मौनी अमावस्या असेल. या दिवशी शाही स्नानही होणार आहे.
03 फेब्रुवारी : या दिवशी तुम्ही वसंत पंचमीला शाही स्नानाचाही लाभ घेऊ शकता.
04 फेब्रुवारी : अचला सप्तमीलाही शाही स्नान होणार आहे.
12 फेब्रुवारी : पौर्णिमेच्या दिवशी महत्त्वाचे शाही स्नान होणार आहे.
08 मार्च : महाशिवरात्रीचा दिवसही शाही असणार आहे. हे शेवटचे शाही स्नान असेल.
कुंभ चार ठिकाणी आयोजित केला जातो:-
हरिद्वार: सूर्य मेष राशीत आणि गुरु कुंभ राशीत असताना हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.
प्रयागराज: गुरु वृषभ राशीत आणि सूर्य मकर राशीत असताना प्रयागराजमध्ये महाकुंभ आयोजित केला जातो.
नाशिक : सूर्य आणि गुरु सिंह राशीत असताना नाशिकमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
उज्जैन : उज्जैनमध्ये आयोजित केलेल्या कुंभाला सिंहस्थ म्हणतात. गुरु सिंह राशीत आणि सूर्य मेष राशीत असताना उज्जैनमध्ये महाकुंभ आयोजित केला जातो.