Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

मार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत

margshirsh guruvar vrat rules
पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.
रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा. चारीबाजूला रांगोळी काढावी.
चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाने चक्राकार करावे. त्यावर हळद-कुंकू वाहावे.
पाण्याच्या तांब्यात दूर्वा, सुपारी आणि शिक्का सोडावा. 
कलशाला बाहेरून हळद-कुंकवाचे बोटं लावावे.
तांब्याच्या नंतर आजूबाजूला विडे किंवा आंब्याची पाने सजवून मधोमध नारळ ठेवावा.
कलश चक्राकारावर ठेवावा.
समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे.
लक्ष्मीसमोर दिवा लावावा.
ALSO READ: मार्गशीर्ष गुरुवार संपूर्ण माहिती Margashirsha Guruvar Vrat
लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करावी.
फळं, मिठाई, दुधाचा नैवेद्य दाखवावा. 
देवीला कमळाचे फूल अर्पित करावे.
लक्ष्मी पूजनानंतर कुटुंबासोबत आरती करावी. 
श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे. व्रत कथा वाचावी.
ALSO READ: श्री लक्ष्मी देवीची कहाणी : मार्गशीर्ष महिन्याच्या गुरूवारी आवर्जून वाचावी ही कथा
मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी. 
संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करुन नैवेद्य दाखवावे. 
गायीसाठी एक पान वेगळं काढावे.
नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे.
दुसर्‍या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे, किंवा तुळशीच्य झाडाला घालावे.
पाने घरातील चोर बाजूला ठेवून द्यावे नंतर निर्माल्यात टाकावे.
शेवटल्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवाष्णींना बोलावून हळद-कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा.
ALSO READ: ॥ श्री महालक्ष्मीची आरती ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम