Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन संपूर्ण विधी

मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन संपूर्ण विधी
, बुधवार, 29 डिसेंबर 2021 (17:14 IST)
मार्गशीर्ष महिन्यातील चारी गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी करुन पूजा केली जाते. पूजेप्रमाणेच याचे विसर्जन उद्यापन करण्याची देखील विधी आहे. अशात तुम्ही महालक्ष्मीची पूजा मांडली असेल तर उद्यापन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या-
 
पवित्र मार्गशीष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. मार्गशीष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुवासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रीचा आदर करतात.
 
चौथ्या गुरुवारी देखील इतर गुरुवारप्रमाणे पुजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी.
महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी.
संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा.
संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करावे.
त्यांना देवी स्वरुप मानून स्वागत व आदर करावे.
सुवासिनींना देवीस्वरूप समजुन त्यांची पुजा करावी.
त्यांना फळे द्यावी. तसेच फुलं, गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तक, एखादी भेटवस्तू द्यावी.
त्यांची ओटी भरावी.
त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा.
उपवास असल्यास दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावे.
या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं.
शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिधा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी.
लक्ष्मी व्रताची कथा वाचावी.
देवीची आरती करावी.
कळत नकळत जरी एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा करा असे म्हणत क्षमा याचना करावी.
तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर रहावी अशी मनोभावे प्रार्थना करावी.
नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असे बोलून गटातील नारळ उचलून ठेवावं.
गजरा, फुलं केसांमध्ये माळावी.
दुर्वा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे.
सुपारी, नारळ आहारात वापरता येतं.
कापड गरजुंना दान करावं.
काही स्त्रिया नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात.
कळशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावे.
हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वत:साठी वापरावे.
 
काही विशेष नियम
अंघोळ न करता पूजा करु नये किंवा पूजेच्या साहित्यला देखील हात लावू नये.
पूजा शांत मनाने करावी. दु:खी किंवा संताप मनाने पूजा करु नये.
मांसाहार करु नये.
घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुरुदेव श्री श्री रविशंकर: मानसिक आणि आध्यात्मिक ताकदीने आव्हानांना सामोरे जा