Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Matsya Avatar मत्स्यावतार कथा

Matsya Avatar मत्स्यावतार कथा
, शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (15:04 IST)
कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णुने मानव जीवन वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता. हिन्दू पुराणांनुसार एक काळ असा आला होता जेव्हा पृथ्वीवर अतिवृष्टी झाली होती ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडुन गेली होती, परंतु केवळ कैलास पर्वताची चोटी आणि ओंकारेश्वर स्थित मार्केण्डेय ऋषींचं आश्रम बुडाले नव्हते. जाणून घ्या मत्स्यावताराची शुभ कथा-
 
पौराणिक कथा : द्रविड़ देशाचे राजर्षि सत्यव्रत कृतमाला नदीत स्नान करत होते. तेव्हा त्यांना आपल्या ओंजळीत पाणी घेतलं तर त्यांच्या हातात एक लहान मासा आला. राजाने मासा पुन्हा पाण्यात सोडून दिला. तेव्हा मासा म्हणे की हे राजा नदीत मोठे-मोठे जीव लहान जीवांना खाऊन घेतात, मलाही कोणी मारुन भक्षण करने म्हणून आपण माझ्या जीवाची रक्षा करा.
 
हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले. त्यांनी मासा कमंडलमध्ये टाकाला परंतु एका रात्रीत माशाचे शरीर इतके वाढले की कमंडल लहान पडू लागले. मग राजाने मासा बाहेर काढून मडक्यात ठेवला. तिथेही एका रात्रीत मासा वाढला. मग राजाने मासा बाहेर काढून त्याला तलावात ठेवले. आता मासा तलावात सोयीस्करपणे मुक्काम करेल याची त्यांना खात्री होती, पण एका रात्रीत तो तलावही माशासाठी खूपच लहान झाला. हे पाहून राजाला आश्चर्य वाटले. तेव्हा राजाला समजले की हा सामान्य मासा नाही.

त्या माशासमोर हात जोडून ते म्हणाला की आपण नक्कीच महान आत्मा आहात हे मला कळले. जर हे खरे असेल तर कृपया मला सांगा की तुम्ही माशाचे रूप का धारण केले आहे?
 
तेव्हा भगवान विष्णू राजर्षी सत्यव्रत यांच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले की हे राजा ! हयग्रीवा या राक्षसाने वेद चोरले आहेत. जगात सर्वत्र अज्ञान आणि अधर्माचा अंधार पसरलेला आहे. हयग्रीवाचा वध करण्यासाठी मी रूप घेईन. आजपासून सातव्या दिवशी महापुराने जमीन समुद्रात बुडवली जाईल. तोपर्यंत तुम्ही एक नाव तयार करा आणि सर्व प्राणीमात्रांचे सूक्ष्म शरीर आणि सर्व प्रकारच्या बिया घ्या आणि सप्‍तर्षींसह त्या बोटीत जा. जोरदार वादळामुळे जेव्हा नाव डळमळीत होईल तेव्हा मी तुम्हा सर्वांचे माशाच्या रूपात रक्षण करेन.
 
तुम्ही नाव माझ्या शिंगाने बांधा. मग मी प्रलयच्या शेवटपर्यंत तुमची बोट ओढत राहीन. त्यावेळी भगवान मत्स्याने नाव हिमालयाच्या शिखरावर बांधली. त्या शिखराला 'नौकाबंध' म्हणतात.

प्रलयाचा क्रोध शांत झाल्यावर भगवान विष्णूने हयग्रीवाचा वध केला आणि त्याच्याकडून वेद हिसकावून पुन्हा ब्रह्मदेवाला दिले. प्रलय संपल्यानंतर परमेश्वराने राजा सत्यव्रत यांना वेदांचे ज्ञान परत दिले. 
 
सत्यव्रत राजाला ज्ञान आणि विज्ञान भरभरून मिळाल्यावर ते वैवस्‍वत मनु म्हणून ओळखले गेले. या बोटीतून वाचलेल्यांपासून जगातील जीवन सुरू झाले.
webdunia
उल्लेखनीय आहे की हयग्रीव अवतारात भगवान विष्णूची मान आणि चेहरा घोड्यासारखा होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुरू नानक यांनी जेव्हा जानवं घालण्यास नकार दिला होता...