ऋषीनगर मध्ये एक केशवदत्त नावाचा गृहस्थ आपल्या बायकोसह राहत होता. अपत्य प्राप्तीच्या हेतूने ते दोघे दर मंगळवारी हनुमानाची पूजा करायचे. वर्षानुवर्षे पूजा केल्यानं देखील काहीच झाले नाही.
काही दिवसानंतर केशवदत्त पूजा करण्यासाठी जंगलात गेला आणि त्याची पत्नी अंजली घरातच राहून मंगळवारचा उपवास करू लागली. एके दिवशी काही कारणास्तव अंजली हनुमानाला नैवेद्य देऊ शकली नाही आणि ती उपाशीच झोपली.
दुसऱ्या दिवसापासून तिने ठरवले की आता पुढील मंगळवार पासून नैवेद्य दाखवूनच जेवण करेन. अंजलीने अन्नपाणी न घेता उपाशी राहून 7 व्या दिवशी मंगळवारी हनुमानाची पूजा केली आणि त्यांना नैवेद्य दाखविला, पण भुकेली आणि तहानलेली असल्यामुळे तिची शुद्ध हरपली.
हनुमान तिला स्वप्नांत दृष्टांत देऊन म्हणाले की -' मुली उठ ! मी तुझ्या पूजेने खूप प्रसन्न झालो आहे आणि तुला एक सुंदर मुलं होण्याचा आशीर्वाद देतो.' अंजलीने उठून हनुमानाला नैवेद्य दिला आणि मग स्वतः जेवली.
हनुमानाच्या आशीर्वादाने अंजलीने एका सुंदर मुलाला जन्म दिले. मंगळवारी झाल्यामुळे त्याचे नाव मंगलप्रसाद ठेवले गेले. काही दिवसानंतर तिचा पती केशवदत्त जंगलातून घरी आला.
त्याने तिला त्या मुला बद्दल विचारले. तेव्हा तिने सर्व घडलेले सांगितले की कसं हनुमानाने तिला आशीर्वाद दिला. पण केशवदत्ताला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही आणि तो अंजली वर संशय घेऊ लागला.
केशवदत्त मंगलप्रसादला ठार मारण्याची योजना आखू लागला. एके दिवशी केशवदत्त स्नान करण्यासाठी आपल्यासह मंगलला देखील विहिरीवर घेऊन गेला. केशवदत्तने संधी साधून मंगलला विहिरीत ढकलून दिले आणि घरी आल्यावर सांगितले की मंगल माझ्या बरोबर नव्हताच, तेवढ्यात मागून मंगल धावत आला. त्याला बघून केशवदत्त आश्चर्यचकित झाला.
त्याच रात्री त्याला स्वप्नात हनुमान येऊन दृष्टांत देऊन म्हणाले 'की तुमच्या भक्तीवर आणि तुम्ही केलेल्या मंगळवारच्या उपासाने मला प्रसन्न केले. आशीर्वाद म्हणून तुम्हाला हे पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. मग तू आपल्या बायकोवर संशय का घेतो?
त्याच क्षणी केशवदत्तने अंजलीला उठवून स्वप्नातले घडलेले सर्व वृत्तांत तिला सांगून तिची क्षमा मागितली आणि आपल्या मुलाला जवळ घेतले. त्या दिवस नंतर ते आनंदाने राहू लागले.
जी जोडपे विधिविधानाने मंगळवारचा उपवास करतात, हनुमानजी त्यांचे सर्व त्रास नाहीसे करतात, त्यांच्या घरात संपती भरपूर देतात, ज्यांना अपत्ये नसतात त्यांना अपत्यप्राप्ती होते आणि शरीरातील सर्व रक्तविकार रोग नाहीसे होतात.