दरमहा दोन एकादशी असतात. शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकारावी तिथी म्हणजे एकादशी. या दिवशी व्रत करतात. ही तिथी प्रभू विष्णुंना समर्पित असते. धार्मिक मान्यतेनुसार एकादशी व्रताचे खूप महत्तव असतं. हिंदू पंचागानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचिनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. जाणून घ्या या दिवशी काय करावे आणि काय टाळावे....
या पवित्र दिवसी प्रभू विष्णूंची पूजा करावी.
या दिवशी उपास करावा.
विष्णुंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी.
या दिवशी लक्ष्मी-नारायणाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
या दिवशी सात्विक भोजन ग्रहण करावं.
या दिवशी मांस-मदिराचे सेवन करु नये.
या दिवशी उपास करत नसला तरी तांदळाचे सेवन करु नये.
या दिवशी कोणाप्रती अपशब्दांचा वापर करु नये.
या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं.
धार्मिक शास्त्रांनुसार या दिवशी दान केल्याचं खूप महत्त्व आहे.
या दिवशी दान-पुण्य करावं.
एकादशीला विष्णुंचा नैवेद्य दाखवावा.
नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचं पान ठेवावं.
देवाला सात्विक पदार्थांचं नैवेद्य दाखवावं.