Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मला पण दर्शन घडवाल का रामाचे ?

मला पण दर्शन घडवाल का रामाचे ?
, बुधवार, 10 मार्च 2021 (18:00 IST)
"श्री तुलसीदासांना" एकदा एका भक्तांने विचारले की...
"महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का ?"
तुलसीदास म्हणाले :- "हो"
भक्त :- मला पण दर्शन घडवाल का ???
तुलसीदास :- "हो नक्की"
तुलसीदासांनी त्याला खुप समर्पक उत्तर दिलं, जे एखाद्या गणिततज्ञाला ही लाजवेल !!!
तुलसीदास म्हणाले , ""अरे हे खुप सोप्पं आहे !!!  तू रामाचे दर्शन तुझ्यातच घेऊ शकशील."
"प्रत्येकाच्या नावांत देखील शेवटी आपल्याला रामाचेच दर्शन घेता येईल. 
त्यासाठी मी तुला एक सुत्रश्लोक सांगतो. 
त्याप्रमाणे कोणाच्याही नावाला ते सुत्र लागु होईल!!!
भक्त :-"कोणते सुत्र ?"
तुलसीदास :- हे ते सुत्र ...
 
|| नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण ||  || तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम || 

वरील सुत्राप्रमाणे आता कोणाचेही नांव घ्या, त्याची अक्षरे मोजा ...
 
१)त्याला (चतुर्गुण) ४ ने गुणा.
२)त्यात (पंचतत्व मिलन) ५ मिळवा.
३)त्याची (द्विगुण प्रमाण) दुप्पट करा.
 
४)आलेल्या संख्येला (अष्ट सो भागे) ८ ने भागा.
 
"पुर्ण भाग जात नाही!!!  दरवेळेस बाकी २ शिल्लक राहतेच ...ते दोन म्हणजेच "राम" ही दोन अक्षर होय... विश्वासच बसत नाही ना???
 
उदा. घेऊ...
कोणाचेही नाव निवडा, अक्षर कितीही असोत !!! उदा. ..निरंजन...४ अक्षरे
 
१) ४ ने गुणा ४x४=१६
२)५ मिळवा १६+५=२१
३) दुप्पट करा २१×२=४२
४)८ ने भागा ४२÷८= ५ पुर्णांक, बाकी मात्र २ !!!
 
बाकी नेहमी दोनच अक्षरे उरतील ती म्हणजे - "राम" !!!
 
विशेष म्हणजे सुत्रश्लोकातील संख्यांना सुद्धा तुलसीदासांनी फार महत्व दिलं आहे!!!
1) चतुर्गुण म्हणजे ४ पुरुषार्थ :- धर्म, अर्थ, काम,मोक्ष !!!
2) पंचतत्व म्हणजे पंचमहाभौतिक :- पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश!!!
3) द्विगुण प्रमाण म्हणजे माया व ब्रह्म असे दोन !!!
4) अष्ट सो भागे म्हणजे आठ दिशांनी (चार दिशा :-पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, चार उपदिशा - आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, आठ प्रकारची लक्ष्मी (आग्घ,विद्या, सौभाग्य, अमृत, काम, सत्य, भोग आणि योगलक्ष्मी )
 
आता प्रत्येकाने स्वतःच्या नावाने हे तपासून पहा ...विस्मयकारक वाटेल पण बाकी नेहमी २ च येईल...
यात तुलसीदासांच्या बुद्धिचातुर्याची व अतुट रामभक्तीची ओळख पटते !!!
 
- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना काळात घरी बसून करा महाशिवरात्री पूजन, जाणून घ्या सोपी पूजा विधी