Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

कपाळावर तिलक धारण करण्यामागील कारण

bindi on forehead
, शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (11:49 IST)
हिन्दू परंपरेनुसार विभिन्न धार्मिक अनुष्ठान आणि पूजा-पाठ करताना कपाळावर टिळा करतात. कपळावर टिळा लावणे शुभ मानले गेले आहे. यासाठी चंदन, कुंकु किंवा शेंदूर वापरलं जातं. सवाष्ण महिलांसाठी कुंकु सौभाग्य आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. परंतू या मागे सशक्त वैज्ञानिक कारण देखील आहे. 
 
वैज्ञानिक तर्कानुसार मानव शरीरात डोळ्यांच्या मध्यभागी कपाळावर एक नस असते. जेव्हा कपाळवर तिलक लावण्यात येतं तेव्हा त्या नसवर दबाव वाढतो ज्याने नस सक्रिय होते आणि त्याचा सकारात्मक प्रभाव चेहर्‍याच्या स्नायूंवर होतो तसेच रक्तसंचार देखील सुरळीत होतं ज्याने ऊर्जेचा संचार होतो आणि सौंदर्यात वाढ होते.
 
धार्मिक दृष्ट्या भृकुटीमध्यात अर्थात दोन्ही भुवयांच्या मधोमध आज्ञाचक्रावर सगुण परमेश्वर वास करतो. म्हणून कपाळावर तिलक करणे म्हणजे देव पूजनासाखरे आहे.
 
तिलक धारण करताना मध्यमेचा उपयोग करावा, असे शास्त्र आहे. मध्यमेचा संबंध हृदयाशी असल्यामुळे या बोटातून प्रवाहित होणारी स्पंदने हृदयापर्यंत जाऊन भिडतात. 
 
भृकुटीमध्यात निवास करणार्‍या परमेश्‍वरास तिलक लावतांना तृतीय नेत्रातून स्फुरणारी स्पंदने मध्यमेद्वारा हृदयात जाऊन भिडल्यामुळे दिवसभर मनात भक्‍तीभाव आणि शांती नांदते.
 
स्त्रियांनी स्वतःला कुंकू लावताना अनामिकेने, तर दुसर्‍या स्त्रीला किंवा पुरुषाला कुंकू लावतांना मध्यमेने लावावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोणाला आहे श्राद्ध कर्म करण्याचा अधिकार, जाणून घ्या