Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Reason Of Covering Head During Puja : या पाच कारणांमुळे पूजेदरम्यान डोकं झाकण्याची परंपरा, हे केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही आवश्यक

Aasmai puja
, शुक्रवार, 13 मे 2022 (19:16 IST)
डोके झाकण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. ज्येष्ठांना आदर देण्यासाठी महिला नेहमी साडी किंवा दुपट्ट्याने डोके झाकतात.डोके झाकणे हे आदराचे सूचक असले तरी पूजेच्या वेळी डोके झाकणे केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही आवश्यक आहे.
 
हिंदू धर्मासह शीख आणि मुस्लिम धर्मांमध्ये धार्मिक कार्यादरम्यान डोके झाकणे आवश्यक आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पूजेत महिला आणि पुरुष दोघांनीही डोके झाकणे का आवश्यक आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..
 
पूजेत डोके झाकण्याची मुख्य कारणे
असे म्हणतात की पूजेच्या वेळी डोके झाकल्याने चंचल मन भटकत नाही आणि संपूर्ण लक्ष पूजेवर केंद्रित राहते. याद्वारे भक्तांना भगवंताशी जोडता येते.

जसे आपण वडीलधार्‍यांच्या सन्मानार्थ आपले डोके झाकतो, त्याचप्रमाणे आपण देवाला मान देण्यासाठी आपले डोके झाकतो. पूजेच्या वेळी डोके झाकणे हे देवाच्या आदराचे लक्षण मानले जाते.

डोके झाकण्याचे एक कारण असेही सांगितले जाते की शास्त्रानुसार पूजेत काळ्या रंगाचा वापर निषिद्ध मानला जातो. आपले केस देखील काळे आहेत, त्यामुळे पूजेच्या वेळी नकारात्मकता टाळण्यासाठी डोके झाकणे आवश्यक आहे.

शास्त्रात पूजेसाठी स्त्री-पुरुषांसाठी समान नियम आहेत. त्यामुळे महिलांसोबतच पुरुषांनीही पूजेत डोके झाकणे आवश्यक आहे.

अनेकांना केस गळणे, कोंडा होणे इत्यादी समस्या असतात. अशा स्थितीत पूजेच्या साहित्यात केस गळल्याने किंवा कोंडा झाल्यामुळे ते अपवित्र होतात. म्हणूनच पूजेत डोकं झाकावं असं म्हणतात.

पूजेत डोके झाकण्यामागे अनेक प्रकारच्या कथा सांगितल्या जातात. यातील एका आख्यायिकेनुसार, नायक, उपनायक आणि खलनायक देखील त्यांच्या डोक्यावर मुकुट परिधान करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री नृसिंह जयंती : नारायण नारायणाचा जप प्रल्हाद करीत असें