Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Sant Chokhamela Punyatithi संत चोखामेळा पुण्यतिथी

chokhoba
संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील भक्ती परंपरेतील आणि वारकरी संप्रदायातील एक अत्यंत महत्त्वाचे संत कवी होते. संत चोखामेळा यांची पुण्यतिथी वार्षिक वैशाख कृष्ण पक्ष पंचमी तिथीला असते.
 
महाराष्ट्रातील यादव काळातील संत चोखोबा हे संत नामदेवाच्या संतमेळाव्यातील वारकरी संत होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात मेहुणा गावात झाला व ते महार जातीचे होते.  
 
संत चोखामेळा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होते.  चोखामेळा हे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण या गावंचे रहिवाशी. तसेच उदरनिर्वाहासाठी पंढरपूरी शके 1200 साली आले. पंढरपूरी आल्यानंतर त्यांना विठठल भक्तीत दंग झाले. ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरणात व भजनात रंगून जायचे.  
 
संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ होते. ते उदरनिर्वाहासाठी कबाड कष्ट मोलमजुरी करत होते. त्यांची पत्नी सोयराबाई, बहीण निर्मला, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे कबाड कष्ट उपसायचे आणि नित्यनेमाने आणि भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण करायचे.
 
चोखोबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता.ते ओळखून  नामदेवांनी चोखोबांची हाडे गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली.
 
महत्त्वाचे पैलू
सामाजिक समता: त्यांनी आपल्या अभंगांतून सामाजिक विषमतेवर आणि जातीभेदावर मार्मिक भाष्य केले.  
 
नामदेव महाराजांचे शिष्य: संत चोखामेळा हे संत नामदेवांचे शिष्य मानले जातात. त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य (पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मेहुणा बंका आणि मुलगा कर्ममेळा) विठ्ठलभक्तीत तल्लीन होते.
 
समाधी: संत चोखामेळा यांची समाधी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर (पायरीशी) आहे.  
 
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वारकरी संप्रदायात विशेष भजन, कीर्तन आणि त्यांच्या अभंगांचे वाचन केले जाते. त्यांच्या शिकवणुकीतून आजही समाजप्रबोधन आणि समतेचा संदेश मिळतो.
Edited by-Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरती गुरुवारची