माणसाचे खरोखर देव
कोण असतील तर ते
आई बाप.
अडाणी राहू नका,
मुला-बाळांना शिकावा.
जो वेळेवर जय मिळवतो
तो जगावरही जय मिळवतो.
दगड धोंड्यांची पूजा करण्यात
वेळ आणि शक्ती
वाया घालवू नका.
कोणी तुम्हाला जात विचारली, तु कोण?
तर म्हणावं मी माणूस.
माणसाला जाती दोनच आहेत.
बाई आणि पुरुष.
या दोनच जाती आहेत. तिसरी जातच नाही.
दान घेण्यासाठी हात पसरू नका,
दान देण्यासाठी हात पसरा.
दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय
सुखाचे किरण दिसत नाही.
धर्माच्या नावाखाली
कोंबड्या बकऱ्या सारखे
मुके प्राणी बळी देवू नका.
माणसाने माणसाबरोबर
माणसासारखे वागावे
हाच बोध मी ग्रहण केला आहे.
शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते
आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते.
शिक्षण हे
समाज परिवर्तनाचे साधन आहे.
देवळात देव नाही. देव कुठे आहे?
या जगात देव आहे. जगाची सेवा करा. गरिबांवर दया करा.
काही करुन मरा. फक्त खाऊन मराल तर फुकट जन्म आहे.
आई बापची सेवा करा.
विद्या शिका आणि गरिबाला विद्यासाठी मदत करा.
शाळेहून थोर मंदिर नाही. उदार देणगी शाळेला द्या.
भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ.
सगळे साधू निघून गेले आहेत
आता उरले आहेत ते फक्त
चपाती चोर (ढोंगी)
हुंडा देऊन किंवा
घेऊन लग्न करू नका.
ज्या घरात देवाचं भजन असेल, त्या घराच्या दरवाज्यावर परमेश्वर राखण आहे.
ज्या घरात निंदा असतील, फुकट गप्पा असतील, कमी-जास्त गोष्टी असतील,
त्या घराच्या दरवाजावर यमराज आहे.
घरीदारी व गावात नेहमी स्वच्छता ठेवा.
गाय सुखी, तर शेतकरी सुखी आणि शेतकरी सुखी, तर जग सुखी.
म्हणूनच गोपालन, पशुपालन प्रेमाने करा आणि सर्व प्राणिमात्रांवर दया करा. हाच आजचा धर्म आहे.
सुरुवात कशी झाली, यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.