Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Saphala Ekadashi 2022:नावाप्रमाणेच मनोकामना पूर्ण करणारी सफला एकादशी महत्त्व, पूजा विधी, कथा जाणून घ्या

Saphala Ekadashi 2022:नावाप्रमाणेच मनोकामना पूर्ण करणारी सफला एकादशी महत्त्व, पूजा विधी, कथा जाणून घ्या
, सोमवार, 19 डिसेंबर 2022 (10:11 IST)
हिंदू धर्मातील सर्व उपवासांपैकी सर्वोत्तम एकादशी (एकादशी ) व्रताला खूप महत्त्व आहे. एकादशी महिन्यातून दोनदा साजरी केली जाते.यंदा १९ डिसेंबर रोजी सफला एकादशीचे व्रत आहे. भगवान विष्णूने लोककल्याणासाठी आपल्या शरीरातून पुरुषोत्तम महिन्याच्या एकादशीसह एकूण 26 एकादशांची उत्पत्ती केली. सर्व एकादशींमध्ये नारायणाप्रमाणे फल देण्याची क्षमता असते. या दिवशी संपूर्ण विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते.या दिवशी मंदिराखाली दिवा आणि तुळशीचे दान करण्याचे महत्त्व सांगितले आहे. 
 
जो व्यक्ती मनोभावे या एकादशीचे व्रत करतो आणि रात्री जागरण करतो त्याला वर्षानुवर्षाचे पुण्य प्राप्त होते. या दिवशी भगवान विष्णूची पूजाअर्चना करा, पहाटे उठून व्रताचे संकल्प करा. दिवसभर निराहार राहून सायंकाळी भगवानाला पिवळे वस्त्र, केळ आणि लाडूचा प्रसाद दाखवावा, सत्यनारायण कथापाठ करून आरती करा. या एकादशीच्या दिवशी तांदळाचा कोणताही पदार्थ बनवू नये किंवा भगवान विष्णूला तांदूळ अर्पण करू नये. दुसर्‍या दिवशी पहाटे सूर्य भगवानाला अघ्र्य अर्पण केल्यानंतर व्रताचे पारायण करावे.
 
एकादशी पूजा विधी
या दिवशी व्रत ठेवून भगवान विष्णूच्या मूर्तीचे पूजन करणे, 'ओम नमो भगवते वासुदेवाय' मंत्राचा उच्चार करणे, पंचामृत इत्यादींनी स्नान करणे, वस्त्र, चंदन, जनेयू, सुगंध, अक्षत, फुले, धूप-दीप, नैवेद्य, हंगामी फळे, सुपारी. पान, नारळ वगैरे अर्पण केल्यानंतर कापूर लावून आरती करावी. 
 
कथा
चंपावती नगरीमध्ये एक महिष्मान नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला चार मुले होती. त्यातील लुम्पक नावाचा मोठा राजपुत्र महापापी होता. तो दररोज परस्त्री आणि वेश्यागमन तसेच इतर दुसर्‍या वाईट कामाकरिता पित्याच्या धनाचा दुरुपयोग करीत होता. तसेच देवता, ब्राह्मण, वैष्णवांची निंदा करीत होता. जेव्हा राजाला त्याच्या मुलाच्या या कुकृत्याबाबत कळले तेव्हा त्याने त्याला राज्यातून बाहेर हाकलून दिले. पित्याने हाकलून दिल्यानंतर काय करावे म्हणून त्याने चोरी करण्याचा निश्‍चय केला. दिवसा तो जंगलात राहत होता आणि रात्री आपल्या पित्याच्याच नगरीमध्ये चोरी करीत असे. इतकेच नाही तर तो प्रजेला त्रास देत असे आणि कुकर्म करीत असे. त्याच्या या वाढत्या प्रकारामुळे जनता भयभीत झाली होती. त्यानंतर त्याने जंगलात राहत असताना पशुपक्ष्यांची शिकार करून त्याला खाऊ लागला. महिष्मान नगरीतील जनता त्याला पकडत तर असे, पण राजाच्या भीतीपोटी त्याला सोडून देत असे. ज्या जंगलामध्ये तो राहत होता त्या ठिकाणी एक भव्य आणि अतिप्राचीन पिंपळाचे झाड होते. नगरीतील जनता त्याची मनोभावे पूजा करीत असते. त्याच झाडाच्या खाली तो महापापी लुम्पक राहत होता. या जंगलाला जनता देवीदेवतांची नगरी मानत असत. काही काळ गेल्यानंतर लुम्पकच्या अंगावरील कपडे जीर्ण झाल्यामुळे निर्वस्त्र झाला. त्यात पौष कृष्ण पक्षातील दशमीच्या रात्री पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तो कडकडू लागला. दिवस उजाडता- उजाडता तो मूच्र्छित झाला. दुसर्‍या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या गर्मीमुळे त्याला जाग आली. कसाबसा स्वत:ला सावरत तो काही खायला मिळते का, हे पाहण्यासाठी फिरू लागला. पशुपक्ष्यांची शिकार करण्याइतकी शक्तीही त्याच्या अंगात राहिली नव्हती. त्यामुळे ज्या ठिकाणी झाडांची जमिनीवर पडलेली फळे दिसली. तो गोळा करून तो त्याच पिंपळाच्या झाडाखाली आला. तोपर्यंत सूर्य मावळतीला आला होता. तेव्हा आणलेली फळे त्याने झाडाच्या खाली ठेवली आणि परमेश्‍वरला प्रार्थना करून ती अर्पण केली. त्याच्या या उपवास आणि जागरणामुळे भगवान प्रसन्न झाले आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले. 
 
दुसर्‍या दिवशी पहाटे एक अतिसुंदर घोडा आणि अनेक वस्तूंनी सजलेला एक रथ त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याचवेळी श्री नारायणाच्या कृपेने तुझे सर्व पाप नष्ट झाले असून आता तू पित्याकडे जाऊन राज्य प्राप्त कर, अशी आकाशवाणी झाली. ही वाणी ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि दिव्य वस्त्र धारण करून 'भगवान की जय हो' असे म्हणत पित्याकडे गेला. 
 
पित्यानेही प्रसन्न होऊन संपूर्ण राजपाट त्याला सोपविला आणि धार्मिक कार्याकरिता निघून गेला. त्यानंतर चंपावती नगरीवर लुम्पक राजा राज्य करू लागला. त्याची पत्नी, पुत्र सगळेच भगवान नारायणाचे भक्त झाले. वृद्ध झाल्यानंतर लुम्पक आपल्या मुलाच्या हाती राज्यभार सोपवून तपस्या करण्याकरिता जंगलात निघून गेला. त्यानंतर तो वैकुंठास गेला. त्यामुळे जो मनुष्य या परमपवित्र एकादशीचे व्रत करतो त्या शेवटी मुक्ती मिळते. आणि जे हे व्रत करीत नाही ते पशूपेक्षा काही कमी नसतात. या सफला एकादशीचे व्रत केल्याने, माहात्म्य वाचल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्याला अश्‍वमेध यज्ञाचे फळ मिळते.' 

Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Christmas Party Food Ideas 2022: ख्रिसमस पार्टीच्या मेनू मध्ये या चविष्ट पदार्थांचा समावेश करा