Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

कौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा

shir shri
, मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (00:53 IST)
तुम्ही एखाद्याचे कौतुक कधी करता? जेव्हा ते काही तरी असाधारण, असामान्य आणि त्यांच्या स्वभावात नाही असे काहीतरी करतात तेव्हा. असेच आहे ना?
 
उदा. एखादी दुष्ट व्यक्ती कोणतीही ससमस्या निर्माण करत नाही. तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता किंवा जी व्य्ती वाईट आहे असे तुम्हाला वाटते, त्या व्यक्तीने एखादे चांगले काम केले तर तुम्ही त्याचे कौतुक करता. जेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. त्याचप्रमाणे एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुम्हाला वाहनातून योग्य स्थळी नेले तर तुम्ही त्याचे कौतुक करता. पण बस चालकाचे कौतुक करालच असे नाही. 
 
वरील सर्व उदा. ती कामे क्षणिक, व्यक्तीरेखेपेक्षा वेगळी किंवा त्या व्यक्तीच्या स्वभावात न बसणारी आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याचे, एखाद्या गोष्टीसाठी कौतुक करता तेव्हा तुम्ही असे दर्शविता की, ते सर्वसाधारण जसे असतात तसे आता नाहीत. 
 
प्रश्न : एखाद्या व्यक्तीला आपले कौतुक व्हावे असे वाटत असेल तर?
 
याचा अर्थ असा की, ते त्यांच्या स्वभावात नसलेले काही करत आहेत आणि म्हणून त्यांना आपले कौतुक व्हावे असे वाटत आहे. जर ते स्वभावत: त्यांच्याकडून येत नसेल तर ते त्यांच्यावर लादलेले काम असेल. म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्याचे कौतुक करता तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा की, तो त्यांचा स्वभाव नाही. ते नेहमी जसे असतात तसे नाहीत. ते एक दुर्मीळ कृत्य किंवा गुण आहे. कौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा, तेव्हा एखाद्याचे कौतुक करताना सावध राहा. 
 
श्री श्री रविशंकर 
 
(‘मोन एक उत्सव’ मधून साभार) 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना सोडण्याचा प्रयत्न करा