Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Skanda Sashti 2022: स्कंद षष्टीची तारीख, महत्त्व आणि पूजा पद्धती जाणून घ्या

Skanda Sashti 2022: स्कंद षष्टीची तारीख, महत्त्व आणि पूजा पद्धती जाणून घ्या
, शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (08:39 IST)
Skanda Sashti 2022: स्कंद षष्ठी हा दक्षिण भारतात साजरा केला जाणारा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे. या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकराचा पुत्र कार्तिकेय यांची पूजा केली जाते. भगवान स्कंद यांना मुरुगन, कार्तिकेयन, सुब्रमण्य असेही म्हटले जाते. हा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला साजरा केला जाईल. यावेळी ही मासिक स्कंद षष्ठी 7 जानेवारी रोजी साजरी होणार आहे. कार्तिकीची पूजा केल्याने रोग, दु:ख आणि दारिद्र्य नाहीसे होते, असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार, भगवान शंकराच्या तेजाने जन्मलेल्या स्कंद या सहा मुखी बालकाचे सहा कृतिकांनी स्तनपान करून संरक्षण केले होते, म्हणून त्याचे नाव कार्तिकेय पडले.
स्कंद षष्ठी मुहूर्त 
सुरुवात: ७ जानेवारी, शुक्रवार, सकाळी ११:१० 
षष्ठी तिथी समाप्ती: ८ जानेवारी, शनिवार सकाळी १०:४२
 
स्कंद षष्ठीचे महत्त्व 
स्कंद पुराणात कुमार हा कार्तिकेय आहे आणि हे पुराण सर्व पुराणांमध्ये सर्वात मोठे मानले जाते. स्कंद षष्ठीचे व्रत केल्याने वासना, क्रोध, मद, आसक्ती, अहंकार यापासून मुक्ती मिळते आणि योग्य मार्गाची प्राप्ती होते, असे शास्त्रात सांगितले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार भगवान कार्तिकेय षष्ठीतिथी आणि मंगळाचा स्वामी असून त्यांचा निवास दक्षिण दिशेला आहे. म्हणूनच ज्या लोकांच्या कुंडलीत कर्क राशीत मंगळ नीच आहे, त्यांनी मंगळ बलवान होण्यासाठी आणि मंगळाचे शुभ फल मिळण्यासाठी या दिवशी भगवान कार्तिकेयचे व्रत करावे. स्कंद षष्ठी भगवान कार्तिकेयाला प्रिय असल्यामुळे या दिवशी व्रत पाळावे. स्कंद षष्ठी व्यतिरिक्त या दिवसाला चंपा षष्ठी असेही म्हणतात कारण भगवान कार्तिकेयाला चंपा फुले आवडतात. 
 
स्कंद षष्ठीची उपासना पद्धत
स्कंद षष्ठीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून शुद्धी करा. 
यानंतर एका पदरावर लाल कपडा पसरवून भगवान कार्तिकेयच्या मूर्तीची स्थापना करा.
यासोबतच शंकर-पार्वती आणि गणेश यांच्या मूर्तींचीही प्रतिष्ठापना करावी. 
यानंतर कार्तिकेयजींच्या समोर कलश स्थापित करा. 
त्यानंतर सर्वप्रथम गणेशाची पूजा करावी. 
शक्य असल्यास अखंड ज्योत लावावी, सकाळ संध्याकाळ दिवा लावावा. 
यानंतर भगवान कार्तिकेयाला जल अर्पण करा आणि नवीन वस्त्रे घाला. 
फुले किंवा फुलांच्या हार अर्पण करून फळे आणि मिठाई अर्पण करा.
विशेष कार्य सिद्धीसाठी या दिवशी केलेली उपासना फलदायी ठरते, असे मानले जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मकर संक्रांतीची पौराणिक कथा