Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वामन जयंती विशेष: फक्त 2 पावलांमध्ये मापले पृथ्वी आणि स्वर्ग

webdunia
गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (18:47 IST)
दर वर्षी प्रमाणे यंदाही भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षाच्या द्वादशी तिथीला वामन प्रगटोत्सव साजरा करण्यात येतो. सत्ययुगात या तिथीला भगवान विष्णूंनी वामनरूपात अवतार घेतले होते. यंदाच्या वर्षी 29 ऑगस्टला हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याला वामन द्वादशी देखील म्हणतात. असे मानले जाते की भगवान विष्णू राजा बळीच्या आततायी पणाला कंटाळलेल्या लोकांना त्याचा त्रासापासून मुक्त करण्यासाठी वामन अवतारात अवतरले. श्रीमद् भगवद् अवतारांनुसार अभिजित मुहूर्तांवर भगवान वामन प्रगट झाले असे. अशी मान्यता आहे की या दिवशी उपवास केल्याने भगवान वामन सर्व कष्ट दूर करतात.
 
अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णूंच्या या अवताराचे महर्षी कश्यप ऋषींसह यज्ञोपवीत संस्कार केले असे. या व्यतिरिक्त वामन बटुकला महर्षी पुलह यांनी यज्ञोपवीत, अगस्त्य यांनी मृगचर्म, मरिचीने पलाश दंड, अंगिरसाने कापडं, सूर्याने छत्र, भृगुने खडावा, गुरु देवांनी जानवे आणि कमंडळु, देवआई अदितीने कॉपीनं, सरस्वतीने रुद्राक्षाची माळ आणि कुबेराने भिक्षा पात्र दिले होते. 
 
वामन अवताराशी निगडित काही पौराणिक कथा
 
1 सत्ययुगात एकदा दैत्यराज बळी ने इंद्राला हरवून स्वर्गावर आपले आधिपत्य गाजवले. इंद्राची अशी ही अवस्था बघून माता अदितींना वाईट वाटले त्यांनी आपल्या मुलाचं चांगलं होण्यासाठी विष्णूची उपासना केली. विष्णू प्रगट होऊन म्हणाले - देवी आपणांस काळजी नसावी. मी आपल्या पोटी जन्म घेऊन इंद्राला त्यांचे राज्य आणि वैभव परत मिळवून देईन.   
 
2 विष्णूजी देवमाता अदितीच्या पोटी वामनरूपात अवतरले. एके दिवशी जेव्हा राजा बळी अश्वमेघ यज्ञ करीत असे, तेव्हा वामनदेव बळी कडे गेले आणि त्यांनी 3 पावले जमीन देणगी स्वरूपात मागितली. बळी ने हातात पाणी घेऊन 3 पावले जमीन देण्याचा संकल्प घेतला.
 
3 संकल्प पूर्ण होतातच वामनाचा आकार वाढू लागला. त्यांनी सर्वात पहिल्या पावलात संपूर्ण धरा आणि दुसऱ्या पावलात स्वर्ग मापले. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी कोणतीही जागा शिल्लक राहिली नाही तर बळी वामन देवाला म्हणाले की हे देव- संपत्तीचा स्वामी संपत्ती पेक्षाही मोठा असतो. म्हणून आपण आपले तिसरे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवावे. 
 
4 सर्वकाही हरपून बसलेल्या बळीला आपल्या वचनाशी कटिबद्ध असलेले बघून वामनदेव प्रसन्न झाले. त्यांनी जसंच बळीच्या डोक्यावर आपले तिसरे पाऊल ठेवले, ते पाताळात गेले. त्यानंतर भगवान विष्णूंनी त्याला पाताळलोकाचे स्वामी केले.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

नारदकृत - संकटनाशन स्तोत्रात उल्लेखित बारा नावे व त्यांची सद्यस्थाने