महाभारतातील महत्त्वाचे पात्र महात्मा विदुर यांनी रचलेले नीतीची पुस्तके विदुरनीती हे आहे. या मध्ये लोकांच्या कल्याणासाठी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहे. असे म्हणतात की महात्मा विदुरांचे धोरण आणि भगवान श्रीकृष्ण बरोबर असल्याने पांडव महाभारताचे युद्ध कौरवांचा पराभव करून जिंकू शकले. विदुरच्या धोरणानुसार, ज्या लोकांमध्ये काही विशिष्ट वाईट सवयी असतात त्यांच्यावर आई लक्ष्मी कधीच कृपा करीत नाही. असे लोक नेहमीच पैशा साठी तळमळतात.
1 आळशी -
विदुर म्हणतात की आळशी लोकांवर कधीही लक्ष्मी कृपा करीत नाही. अशा लोकांना नेहमी नशिबासाठी रडावे लागते. महात्मा विदुर म्हणतात की जे लोक आळशी असतात, ते लोक स्वतःचेच वाईट करण्यासाठी कारणीभूत असतात. आळस हा माणसाचा सर्वात मोठा वैरी मानला आहे.आळसच दारिद्र्य आणतो. जे लोक आळशी असतात त्यांना आपल्या आयुष्यात धनाचा अभाव सहन करावा लागतो.
2 कामचुकार लोक -
विदुर म्हणतात की कठोर परिश्रम हीच यशाची पायरी असते. पण जे लोक कामाचा कंटाळा करतात,त्यांच्या कडे कधीही पैसे येत नाही. काही लोक अशी असतात ज्यांना बसूनच प्रगती,यश आणि काम मिळवायचे असते. पण खरं तर त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करणे खूप आवश्यक आहे. जे लोक परिश्रम करीत नाही त्यांचा वर ईश्वर देखील कृपा करीत नाही.
3 देवावर विश्वास न करणारे -
विदुर म्हणतात की जे लोक देवावर विश्वास करीत नाही त्यांच्या वर ईश्वराची कृपा होत नाही. असे लोक दारिद्र्यात आपले आयुष्य घालवतात. माणसाला नेहमी देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. दररोज आपल्या मनात भगवंताचे स्मरण करा. शक्य असल्यास घरात धुपकांडी आणि दिवा लावावा.