खूप कमी लोकांनाच माहीत असेल की विष्णू, इंद्र आणि ब्रह्माप्रमाणे हिंदू धर्मात गणपतीचेही स्त्री रूप आहे. विनायक गणपतीच्या या स्त्री रूपाला विनायकी या नावाने ओळखले जाते. त्यामागील कहाणी अशी आहे.
दैत्य अंधक पार्वतीला पत्नीच्या रूपात प्राप्त करू इच्छित होता. त्याची जबरजस्ती बघून पार्वतीने महादेवाला आव्हान केले, तेव्हा महादेवाने आपले त्रिशूळ काढले आणि त्याचे वध केले. परंतू असुराकडे दिव्य शक्ती होती, त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडत्याक्षणी आणखी अंधक तयार होत होते. त्याला संपवण्याचा एकमेव उपाय होता की त्रिशूळाने वार होताना असुराच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडता कामा नये.
देवी पार्वती जाणत होत्या की प्रत्येक दैवी शक्तीचे दोन तत्व असतात. पहिला पुरूष जे त्याला मानसिक रूपाने सक्षम करतं आणि दूसरं तत्व स्त्रीचे जे त्याला शक्ती प्रदान करतं. म्हणनू देवी पार्वतीने सर्व शक्तींना आव्हान केले. त्यांच्या आव्हानामुळे प्रत्येक देव शक्ती रूपी स्त्री स्वरूपात प्रकट झाले ज्यांनी अंधकाचे रक्त जमिनीवर पडण्यापूर्वीच प्राशन केले.
इंद्र इंद्राणी रूपात, विष्णू वैष्णवी रूपात आणि ब्रह्मा ब्राह्मणी रूपात प्रकट झाल्या. या शक्तींनी अंधकाचे रक्त जमिनीवर पडण्यापूर्वीच प्राशन केले आणि अंधकाचे नाश झाले.
मत्स्य पुराण आणि विष्णू धर्मोत्तर पुराणाप्रमाणे या शक्तींमध्ये गणपतीचेही स्त्री रूप सामील होते. त्या शक्तीचे नाव विनायकी होते ज्याला गणेश्वरी म्हणूनही ओळखले गेले. गणपतीच्या या रूपाला वन दुर्गा उपनिधेषात पुजले गेले आहे.
गणपतीच्या स्त्रीरूपाचे चित्र 16 व्या शतकात समोर आले. काही लोकांचे म्हणणे होते की हे चित्र मालिनी, अर्थात दिसायला हत्ती सोंड असलेल्या पार्वतीसारखे प्रतीत होतं जे दिसायला अगदी पार्वतीसारखे असून केवळ त्यांचे शीश गणपतीप्रमाणे गजसारखे आहे.